शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रबोधनामुळे कोल्हापूरकरांची पर्यावरणपूरक ‘फटाकेमुक्ती’कडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 11:49 IST

निसर्गमित्र, शिवाजी मराठा हायस्कूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांनी  ‘फटाकेमुक्त दिवाळी’साठी राबविलेल्या विविध प्रबोधनपर उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. यावर्षी फटाके वाजविणे टाळणाऱ्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. पर्यावरणपूरक दिवाळीला कोल्हापूरकरांचा वर्षागणिक प्रतिसाद वाढत आहे.

ठळक मुद्देविविध संस्थांच्या उपक्रमांना यशकोल्हापूरकरांचा वर्षागणिक वाढता प्रतिसाद

 कोल्हापूर , दि. २१ : निसर्गमित्र, शिवाजी मराठा हायस्कूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांनी  ‘फटाकेमुक्त दिवाळी’साठी राबविलेल्या विविध प्रबोधनपर उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. यावर्षी फटाके वाजविणे टाळणाऱ्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. पर्यावरणपूरक दिवाळीला कोल्हापूरकरांचा वर्षागणिक प्रतिसाद वाढत आहे.

हवा आणि ध्वनी प्रदूषणात फटाक्यांमुळे भर पडते. त्यामुळे आरोग्य बिघडते. ते टाळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरमध्ये फटाके टाळून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी व्हावी, यासाठी विविध संस्था प्रबोधन करीत आहेत.

यातील निसर्गमित्र संस्था फटाके न वाजविणाऱ्या  मुलांसाठी निसर्गसहल काढते. त्यासह या संस्थेमार्फत विद्यार्थी हे व्यापाऱ्याना ‘दीपावली पाडवा व लक्ष्मीपूजनाचा आनंद फटाके न वाजवता मिठाई वाटून साजरा करूया,’ अशा आशयाची पत्रे पाठवितात.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शालेय विद्यार्थ्यांना संकल्पपत्र पुरवून ‘फटाकेमुक्त दिवाळी’ साजरी करण्याची शपथ देण्याचा उपक्रम राबविते. शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थी हे फटाके वाजविणे टाळून त्यातून बचत होणाऱ्या पैशांमधून त्यांच्या शाळेतील गरीब मित्र-मैत्रिणीला दिवाळीची कपडे भेट देतात.

या संस्थांतर्फे गेल्या १० ते १५ वर्षांपासून हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. काही व्यक्ती या वैयक्तिकपणे फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करतात. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा फटाके वाजविणाऱ्याचे प्रमाण कमी झाल्याचे जाणवत आहे.

चांगली साथगेल्या दहा-बारा वर्षांपासून ‘निसर्गमित्र’सह विविध संस्थांनी शालेय विद्यार्थ्यांचे फटाकेमुक्त दिवाळीसाठी प्रबोधन केले. त्याचा चांगला परिणाम झाला असल्याचे ‘निसर्गमित्र’चे कार्यवाह अनिल चौगुले यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रदूषण करणारे फटाके लावणे लोक स्वत:हून टाळत आहेत. त्याऐवजी अनेकांनी शोभिवंत फटाक्यांच्या वापरावर भर दिला आहे.काहीजणांनी सामाजिक उपक्रमांना बळ दिले आहे. पर्यावरणपूरक दिवाळीबाबतच्या आमच्या उपक्रमांना नागरिकांची चांगली साथ मिळत आहे. प्रबोधन आणि नागरिकांचे पाठबळ यांमुळे कोल्हापूरची ‘फटाकेमुक्त दिवाळी’च्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दिवाळी सुरू झाल्यापासूनचे चित्र पाहता फटाके कमी वाजत असल्याचे दिसून येत आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने कोल्हापूरकरांचे एक चांगले पाऊल या माध्यमातून पडत आहे. शहरातील विविध भागांत दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची निरीक्षणे नोंदविण्याचे काम आमच्या विभागाकडून सुरू आहे. येत्या चार दिवसांत त्याचा अहवाल तयार केला जाईल.- डॉ. पी. डी. राऊत,पर्यावरण विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ 

 

टॅग्स :pollutionप्रदूषणCrackers Banफटाके बंदी