शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चालक वाहकांनी अशी दिली एस. टी. तील आजी-आजोबांना वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 18:13 IST

एस. टी. ला जर प्रवाशी हवे असतील तर ही सौजण्याची वागणूक हवीच. अशीच प्रतिक्रीया प्रवाशांची होती.

कोल्हापूर : एस. टी. विभागाचे चालक वाहक अनेकदा प्रवाशांना चांगली वागणूक देत असल्याचे सध्या दिसून येत आहे. याचा आणखी एक अनुभव रविवारी रात्री दौंड आगाराच्या एस. टी. बसच्या चालक-वाहकांचा आला.रात्रीची ११ ची वेळ होती. दौंड आगाराची दौंड -कोल्हापूर (एस. टी. क्रमांक- एम. एच.-१४ बी. टी. ३४३६ ) ही कोल्हापूरकडे येत होती. यामध्ये वयोवृद्ध आजी-आजोबा बसले होते. त्यांना इस्लामपूर च्या पेठ नाक्याजवळील स्टॉपवर उतराचे होते. परंतु लांब पल्ल्याची एस. टी. बस असल्याने ती थेट मुख्य महामार्गावरील पुलावरून जाणार होती.

ती सर्व्हिस रोडवरून खाली येऊ शकत नव्हती. परंतु यावेळा रात्री या आजी-आजोबांना कोणी मदत करणार नाही, रिक्षा किंवा अन्य कोणतेही वाहन मिळणार नाही म्हणून त्यांना वाहक संतोष मोहोळकर यांनी चालक नवनाथ थोरे यांच्याशी संपर्क साधून एस. टी. बस थोडीशी मुख्य पुलावरील रस्ता सोडून खालील रस्त्यावर घेण्यास सांगितले. त्यांना व्यवस्थित व सुरक्षितरित्या इस्लामपूर- पेठनाका रस्त्यावर सोडले, यावेळी मात्र त्या आजी-आजोबांनी वाहक व चालकांचे आभार मानले. अवघ्या २ मिनिटाचा हा प्रसंग व पुन्हा मुख्य रस्त्यावर ही एस. टी. बस धावू लागली.

याविषयी वाहकाला विचारले अशी मुख्य मार्गावरून ही एस. टी. बस या शेजारील मार्गावर का आणली असे विचारले असता, वाहक मोहळकर म्हणाले अहो रात्रीची वेळ. त्यांना कोणी त्रास देऊन नये. तसेच त्यांना चालावेही खूप लागले असते. ते सुरक्षित व व्यवस्थित त्यांच्या इच्छित स्थळी जावे म्हणून ही मदत केली. बस्स.. यावरून मात्र आजही एस. टी. बसचे चालक-वाहक प्रवाशांबरोबर सौजण्याने वागत असल्याचे दिसून आले. एस. टी. ला जर प्रवाशी हवे असतील तर ही सौजण्याची वागणूक हवीच. अशीच प्रतिक्रीया प्रवाशांची होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरstate transportएसटी