शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

टाकवडेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: October 1, 2015 23:21 IST

औद्योगिक सुविधांची गरज : पंचगंगा प्रदूषणाचा सर्वाधिक फटका; विकासापासून गाव वंचित

गणपती कोळी -- कुरुंदवाड -टाकवडे (ता.शिरोळ) गाव इचलकरंजी शहरालगत असल्याने पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वांत जास्त फटका या गावाला बसत आहे. त्यामुळे येथे प्रामुख्याने शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. मोठा यंत्रमाग व्यवसाय, अ‍ॅग्रो प्रकल्प यामुळे टाकवडे औद्योगिक गाव बनले असले तरी त्या मानाने औद्योगिक सुविधा नसल्याने विकासापासून हे गाव वंचित राहिले आहे.इचलकरंजी शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेले व सुमारे दहा हजार लोकवस्ती असलेल्या टाकवडे गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याची वाणवा आहे. पंचगंगा नदीकाठी गाव असले तरी इचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिकीकरणाचे रसायनयुक्त सांडपाणी पंचगंगेत सोडल्याने दूषित पाण्याचा फटका या गावाला बसत असल्याने महाराष्ट्र शासनाने व इचलकरंजी नगरपालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचा करार केला आहे. त्यानुसार पालिकेकडून ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर दररोज १७५ लिटर पाणीपुरवठा करण्याचा करार असताना हे पाणी देण्याबाबत नियमितता नसल्याने ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच पालिकेने कृष्णा नळ योजनेतून टॅपिंगने अशुद्ध पाणी दिल्याने गेल्या दोन वर्षांपासून शुद्ध पाण्याचा पुरवठाच बंद केला आहे. परिणामी अशुद्ध पाण्यात केवळ टीसीएल पावडर टाकून ग्रामपंचायतीकडून नळपाणी पुरवठ्याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्राला हे गाव जोडले असले तरी वाहतुकीच्यादृष्टीने गैरसोयीचे असल्याने गावातील उपकेंद्रात ओपीडी सेवा देण्याचा आदेश २००५ मध्ये तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला होता. मात्र, त्यांच्या आदेशाला आरोग्य विभागाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना राबविली आहे. मात्र, रडतखडत ही योजना ७० टक्के पूर्ण झाली आहे. योजना पूर्ण करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी होत आहे.या योजनेतून अंतर्गत पाईपलाईनसाठी जेसीबी मशीनच्या साहाय्याने चर काढल्याने गावातील सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतराचा रस्ता उखडल्याने खराब झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करण्यासाठी गावातील नेतेमंडळींनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. एकेकाळी गावाला पाणीपुरवठा करणारे व मध्यवस्तीतील गावतळ्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने तळ्यात हिरवी झुडुपे उगविली असून, पाण्याला हिरवट रंग आला आहे. त्यामुळे या तळ्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व गावचे सौंदर्य वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष लक्ष घालणे गरजेचे आहे.गावात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. गावच्या उद्योजकांनी अ‍ॅग्रो प्रकल्प गावातच उभा करून गावाचे नाव देशभरात पोहोचविले आहे. मात्र, औद्योगिकीकरणाच्या विशेष सोयीअभावी म्हणावा तसा गावचा विकास झाला नाही. २००८मध्ये क्लस्टर योजनेतून सुमारे पावणेतीन कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, आजतागायत या योजनेतील निधीच मिळाला नसल्याने गावच्या विकासाला खीळ बसली आहे. याशिवाय टाकवडे-जय सांगली नाका जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत असून, ग्रामस्थांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीने गट-तट विसरून गावच्या विकासासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.दूषित पाणीपुरवठाइचलकरंजी नगरपालिकेने गावाला शुद्ध पाणीपुरवठा देणे बंधनकारक असतानाही पाणीपुरवठा बंद केल्याने ग्रामस्थांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील करवीर विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष मानवेंद्रनाथ निर्मळ यांनी संस्थेच्या माध्यमातून ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर शुद्ध पेयजल प्रकल्प उभारून ग्रामस्थांना नवसंजीवनी दिली आहे. या गावाबरोबरच परिसरातील नागरिकही या पाण्याचा वापर करीत असल्याने दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे.