साळगाव बंधा-यात अडकले वाळलेले वृक्ष व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:18 AM2021-06-21T04:18:04+5:302021-06-21T04:18:04+5:30

आजरा : हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधा-यात मुसळधार पावसाने वाहून आलेला वाळलेला वृक्ष व लाकडाचे ओंडके अडकले आहेत. बंधा-याजवळ पाण्याचा ...

Dried trees stuck in Salgaon dam and | साळगाव बंधा-यात अडकले वाळलेले वृक्ष व

साळगाव बंधा-यात अडकले वाळलेले वृक्ष व

Next

आजरा : हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधा-यात मुसळधार पावसाने वाहून आलेला वाळलेला वृक्ष व लाकडाचे ओंडके अडकले आहेत. बंधा-याजवळ पाण्याचा प्रवाह व वेग जास्त असल्याने काढण्यात अडथळे तयार होत आहेत. पुरातून वाहून आलेल्या लाकडी ओंडक्यामुळे साळगाव बंधा-याच्या पिलरला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

हिरण्यकेशी नदीवर ५३ वर्षांपूर्वी साळगाव गावाजवळ कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये या बंधा-याचा आज-याकडील बाजूचा चार नंबरचा दगडी पिलर कोसळला होता. एप्रिलमध्ये १६ लाख रुपये खर्च करून पाटबंधारे विभागाने या पिलरची दुरुस्ती केली आहे. बंधा-याची उंची कमी असल्याने प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या बंधा-यावर पाणी येते. गेल्या चार दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसाने बंधा-यावर पाणी होते. पुराच्या पाण्यातून वाहून आलेले वाळलेले वृक्ष व लाकडी ओंडके बंधा-याच्या पिलरमध्ये अडकले आहेत. सध्या बंधा-याजवळ पाण्याचा वेग जास्त असल्याने हे लाकडी ओंडके काढणे अडचणीचे आहे. मात्र यामुळे बंधा-याच्या पिलरला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

रात्रीपासून बंधा-यावरील पाणी कमी झाल्याने वाहनांची वाहतूक बंधा-यावरून सुरू आहे. बंधा-यात अडकलेला वृक्ष व लाकडी ओंडक्यामुळे पिलरला धोका झाल्यास या मार्गावरील वाहतूक थांबण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाने बंधा-यात अडकलेले वृक्ष व ओंडके पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर तातडीने काढावेत, अशी मागणी होत आहे.

फोटो ओळी : हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधा-यात पिलरमध्ये अडकलेले वृक्ष व लाकडी ओंडके. क्रमांक : २००६२०२१-गड-०९

Web Title: Dried trees stuck in Salgaon dam and

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.