शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

‘स्वप्न’ घराचे अन् लग्नाचे...दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:03 IST

घर पहावे बांधून आणि लग्न पाहावे करून; असा एक वाक्प्रचार आपल्याकडे आहे. तिचा प्रत्यय जो घर बांधायला काढतो किंवा आपल्या मुलाचे अथवा मुलीचे लग्न ठरवतो आणि ते पार पडतो त्यालाच येतो. कारण या दोन्ही गोष्टी करणाऱ्याला कर्जबाजारी करून सोडतात

- चंद्रकांत कित्तुरेघर पहावे बांधून आणि लग्न पाहावे करून; असा एक वाक्प्रचार आपल्याकडे आहे. तिचा प्रत्यय जो घर बांधायला काढतो किंवा आपल्या मुलाचे अथवा मुलीचे लग्न ठरवतो आणि ते पार पडतो त्यालाच येतो. कारण या दोन्ही गोष्टी करणाऱ्याला कर्जबाजारी करून सोडतात. आतातर ‘सर्वसामान्य अथवा मध्यमवर्गीयांने घराचे ‘स्वप्न’ द्यावे सोडून,’ असा नवा वाक्प्रचार रूढ करण्याची वेळ आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ म्हणून योजना राबवत आहे. त्यासाठी २ लाख ७० हजारांपर्यंत अनुदानही देत आहे. हे अनुदान कुणाला मिळत ज्यांची कर्जफेडीची ऐपत आहे. ज्यांना बॅँकेने कर्ज मंजूर केले आहे. बॅँका कुणाला कर्ज देतात त्यासाठीची प्रक्रिया काय असते; हे बॅँकेकडे कर्ज मागणीसाठी गेल्यानंतरच कळते. महिन्याला दहा-पंधरा हजार पगार अथवा मजुरी मिळविणाºयांकडे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रेही गोळा करणे कठीण असते शिवाय येणाºया पगारात कुटुंबाचा चरितार्थ चालवून कर्जाचे हप्ते कसे भागवणार ? शिवाय हे हप्ते एक-दोन वर्षाचे नसतात पंधरा-वीस वर्षे ते भरत राहावे लागतात. त्यामुळे बरेचजण घराचे स्वप्न पाहणेच सोडून देत आहेत. शहरी भागात अख्खे आयुष्य भाड्याच्या घरात काढणारी अनेक कुटुंबे पाहायला मिळतात.

परवा एक मित्र भेटला होता. त्याने बोलता-बोलता आपल्या एका नातेवाईकांची कहाणी सांगितली. त्या नातेवाईकाचा मुलगा यंत्रमागावर काम करतो. राहायला घर नाही म्हणून त्याचे लग्न ठरत नाही. या मुलाचे वडील कर्नाटकातून पोट भरण्यासाठी म्हणून इचलकरंजीत आलेले. येथे आल्यानंतर शेतात काही दिवस मजुरी केल्यांनतर यंत्रमाग चालवायला शिकले. यंत्रमागावर काम करू लागले. लग्न झाले. भाड्याच्या घरात संसार थाटला. संसारवेलीवर दोन मुली, दोन मुले अशी चार फुले उमलली. त्यांचे शिक्षण, मुलींची लग्ने करून देण्यात हयात गेली. दोन वर्षांपूर्वीच अचानक एके रात्री हृदयविकाराचा झटका आला अन् ते गेले. अखेरपर्यंत ते भाड्याच्या घरातच होते. घर घेणे त्यांना जमलेच नाही. अजून एक मुलगा लग्नाचा आहे. मुलींचा शोध सुरू आहे. अनेक स्थळे पाहिली पण राहायला घर नाही, यंत्रमागावर काम करतो या कारणावरून लग्न जुळेना झाले आहे. पाहा एखादी गरिबाची मुलगी असेल तर मुलगा खूप चांगला आहे, असे सांगायलाही हा मित्र विसरला नाही. याला प्रातिनिधीक उदाहरण मानायचे झाले तर सर्वांच्याच वाट्याला अशी वेळ येते असे नाही.

कारण ‘लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळलेल्या असतात;’ असे मानणाराही एक मोठा वर्ग आपल्या समाजात आहे तरीही या मित्राच्या म्हणण्यात तथ्य आहे. सद्य:स्थितीचा विचार करता जागेच्या आणि घराच्या किमती गगनाला गेल्या आहेत. काही लाख रुपये मोजल्याशिवाय घराचे स्वप्न पूर्ण होणे शक्य नाही. कारण यंत्रमाग कामगार अथवा एमआयडीसीतील कारखान्यात काम करणाºया कामगाराला मिळणारा पगार किंवा उत्पन्नाचा स्रोत सांगितला तर बॅँका दारातही उभा करून घेत नाहीत. त्यामुळेच घराचा विचार सोडून देऊन अनेकांना भाड्याच्या घरातच आयुष्य कंठावे लागत आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते घराचे स्वप्न द्यावे सोडून!

लग्नासाठी येणारा खर्च लक्षात घेता वधूपित्याला तो कर्जबाजारी करूनच सोडतो. आजकाल मुली मिळत नाहीत. त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे वरपक्ष फार काही मागत नाही, असे म्हटले जात असले तरी ते खरे नाही. कितीही साधेपणाने लग्न केले तरी रोजंदार किंवा कामगार असलेल्या बापाला त्या लग्नासाठी कर्ज काढावेच लागते. ज्यांना काढावे लागत नाही ते नशीबवानच. केवळ वधूपितेच कर्जबाजारी होतात असेही नाही. मुलाचे लग्न जोरात झाले पाहिजे म्हणून कर्ज काढणारेही काही कमी नाहीत. शेतकरी कर्जबाजारी होण्याचेही एक कारण लग्नसोहळा हे आहे.ही चर्चा फक्त सर्वसामान्यांच्या लग्नाची. श्रीमंतांच्या लग्नातील थाटमाट आणि पैशांची केली जाणारी उधळपट्टी, हौसेच्या नावाखाली सर्वमान्य असते. त्याची मोठी चर्चाही होते. गेल्याच महिन्यात प्रियांका चोप्रा, ईशा अंबानी, दीपिका पदुकोन यांच्या लग्नाची चर्चा खूप झाली. त्यांचे कौतुकही झाले. सर्वसामान्यांच्या घरातील लग्नसोहळे कर्जाविना पार पडावेत यासाठी कुणी प्रयत्न करणार का? समाजाची मानसिकता बदलणार का?

टॅग्स :MONEYपैसाbankबँकkolhapurकोल्हापूर