शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खानविलकर पंप येथील ड्रेनेजलाईनचे काम अखेर पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 16:06 IST

कोल्हापूर शहरातील खानविलकर पेट्रोलपंप ते कसबा बावडा या मार्गावर ड्रेनेजलाईनच्या कामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून रस्ता बंद होता, रविवारपासून अंशत: रस्ता खुला झाला. महापालिकेच्या वतीने सोमवारी येथील मुरुम टाकून रस्त्याचे सपाटीकरण सुरू केले आहे. दरम्यान, वाहतुकीसाठी दिवसभर रस्ता बंद ठेवण्यात आला. सायंकाळनंतर पुन्हा येथून दुचाकी वाहनांची ये-जा सुरू झाली.

ठळक मुद्देखानविलकर पंप येथील ड्रेनेजलाईनचे काम अखेर पूर्णमुरुम टाकून रस्ता करण्यास सुरू

कोल्हापूर : शहरातील खानविलकर पेट्रोलपंप ते कसबा बावडा या मार्गावर ड्रेनेजलाईनच्या कामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून रस्ता बंद होता, रविवारपासून अंशत: रस्ता खुला झाला. महापालिकेच्या वतीने सोमवारी येथील मुरुम टाकून रस्त्याचे सपाटीकरण सुरू केले आहे. दरम्यान, वाहतुकीसाठी दिवसभर रस्ता बंद ठेवण्यात आला. सायंकाळनंतर पुन्हा येथून दुचाकी वाहनांची ये-जा सुरू झाली.महापालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या वतीने १२ जून रोजी खानविलकर पेट्रोल पंप ध्रुव रेसिडेन्सीसमोर (राजहंस प्रिंटिंग प्रेसजवळ) येथे ड्रेनेजलाईनसाठी खुदाई केली होती. ड्रेनेजलाईन आणि क्रॉस ड्रोनचे काम पूर्ण झाले आहे. झालेल्या कामाची तपासणीही करण्यात आली आहे. ४0 लाखांच्या निधीतून हे काम केले आहे.

रस्त्यावर खड्डे आणि मुरुम असतानाही रविवारी दुचाकी, चारचाकी वाहनांची ये-जा सुरू होती. रात्री उशिरा येथे उसाने भरलेला टॅÑक्टर खड्ड्यात अडकला. अखेर रात्री उशिरा जेसीबीने ट्रॅक्टर काढण्यात आला. येथील काम जरी पूर्ण झाले असले, तरी दोन चेंबरच्या स्लॅबच्या ठिकाणी आणखीन पाच दिवस तरी बॅरेकेट लावून ठेवावे लागणार आहेत. सध्या दुचाकींसाठी वाहतूक सुरू आहे. अवजड वाहनांना आणखीन काही दिवस वाहतूक बंद राहणार आहे.डांबरी रस्त्यासाठी करावी लागणार प्रतीक्षाड्रेनेजलाईनसाठी २0 ते २५ फूट खुदाई करण्यात आली होती; त्यामुळे येथे मुरुम टाकून रस्ता करावा लागणार आहे. रस्ता खचू नये; यासाठी मुरुमचे तीन थर द्यावे लागणार आहेत. तसेच डांबरी रस्ता करण्यासाठी टाकलेला मुरमाचा बेस तयार होणे आवश्यक आहे; यासाठी महिनाभरानंतरच डांबरी रस्ता करणे योग्य ठरणार आहे. जर अगोदरच रस्ता केला, तर रस्ता खचण्याचा धोका आहे. दरम्यान, रस्त्यासाठी निधीची तरतूद केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर