: सरवडे, कासारपुतळे परिसरात बौद्धसमाज व निळा रक्षक यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सरवडे येथील बुद्ध विहारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी बुद्ध धम्म वंदना त्रि शरण पंचशील घेऊन विनम्र अभिवादन करण्यात आले, तर कासारपुतळे येथे समाजमंदिरमध्ये स्वप्निल पोवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भीमराव कांबळे, शांताराम कांबळे, गौतम कांबळे, शशिकांत कांबळे, उर्मिला कांबळे, उत्तमराव कांबळे, आनंदा कांबळे, संतोष कांबळे, मच्छिंद्र कांबळे, बाळासाहेब कांबळे, रमेश कांबळे, कासारपुतळे येथे सतीश कांबळे, नितोस कांबळे, योगेश कांबळे, अनिल कांबळे, नीळकंठ कांबळे वैभव कांबळे, अंकुश कांबळे, हर्षद कांबळे, संतोष कांबळे, आदी उपस्थित होते.
सरवडे परिसरात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST