लोकमत न्युज नेटवर्क
पन्हाळा : अहमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यातील करंजे उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शेळके यांनी ६ जुलै रोजी उपकेंद्रामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधील उल्लेखानुसार काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा लसीकरण, अँटिजन टेस्ट, आरटीपीसीआर यासाठी दबाव आणला होता. तसेच दोन महिन्यांपासून थकीत वेतनामुळे आर्थिक घडी विस्कटली होती. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असा उल्लेख केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे डॉ. गणेश शेळके यांना न्याय मिळावा यासाठीचं एक निवेदन पन्हाळा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉ. अभिजित जाधव, उपाध्यक्ष डॉ. मोहनराव कुलकर्णी, खजिनदार संग्राम बनसोडे, हार्दिक कांबळे आणि शिष्टमंडळाच्यावतीने तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.
फोटो : गणेश शेळके यांच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीचे निवेदन पन्हाळा तालुका समूदाय आरोग्य अधिकारी यांच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी डॉ. अभिजित जाधव, डॉ. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
१० पन्हाळा निवेदन