शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
3
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
5
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
6
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
7
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
8
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
9
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
10
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
11
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
12
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
13
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
14
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
16
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
17
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
18
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
19
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
20
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!

By समीर देशपांडे | Updated: December 6, 2025 10:29 IST

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी व सामाजिक न्यायासाठी जे काम केले तेच काम डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पातळीवर करत होते.

समीर देशपांडे, कोल्हापूर ‘संविधान’कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीतच त्यांचा पुतळा कोल्हापूर शहरातील बिंदू चौकामध्ये उभारण्यात आला. पुरोगामी चळवळीतील तत्कालीन अग्रणी भाई माधवराव बागल यांच्या पुढाकारातून जनतेच्या सहभागातून हा पुतळा उभारण्यात आला असून ९ डिसेंबर २०२५ रोजी या पुतळ्याच्या उद्घाटनाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. येथील प्रसिद्ध शिल्पकार स्वर्गीय बाळ ऊर्फ शंकर चव्हाण यांनी हा पुतळा तयार केला होता. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकर यांचे निधन झाले. परंतु त्याआधीच सहा वर्षांपूर्वी त्यांचा पुतळा उभारून करवीरकरांनी त्यांना एक अनोखी मानवंदना दिली होती.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी व सामाजिक न्यायासाठी जे काम केले तेच काम डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पातळीवर करत होते. त्यामुळे आंबेडकर यांच्या हयातीतच त्यांचा पुतळा उभारून सन्मान करण्याची माधवराव बागल यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी पुतळा समिती स्थापन केली. बागल हेच या समितीचे अध्यक्ष होते. बाबासाहेबांच्या विचारांचे जनतेला स्मरण व्हावे, यासाठी पुतळा बिंदू चौकात उभारण्याचे ठरले.

७५ वर्षांपूर्वी उद्घाटन

ब्रांझमधील हा अर्धपुतळा चबुतऱ्यावर बसविण्यात आला असून ९ डिसेंबर १९५० रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हा द. मा. साळोखे हे कोल्हापूरचे नगराध्यक्ष होते तर व्ही. जी. चव्हाण हे सहायक होते. 

गेल्या ७५ वर्षांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती, पुण्यतिथीपासून ते सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमावेळी या पुतळ्याला अभिवादन करूनच कार्यक्रम सुरू करण्यात येतो. बिंदू चौकातील हा डॉ. आंबेडकर यांचा पुतळा त्यांच्या हयातीमधील जगातील पहिला पुतळा मानला जातो.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Honored Dr. Ambedkar with Statue During His Lifetime

Web Summary : Kolhapur erected Dr. Ambedkar's statue in 1950, a rare honor during his life. Madhavrao Bagal led the initiative, recognizing Ambedkar's work mirroring Shahu Maharaj's social justice efforts. The statue, sculpted by Shankar Chavan, remains a focal point for tributes.
टॅग्स :kolhapurकोल्हापूर