शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Mahaparinirvan Din 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पन्हाळगडावर सव्वा एकर जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:42 IST

राजर्षी शाहू महाराजांच्या पश्चात राजाराम महाराज यांच्याकडून बक्षीसपत्र : आंबेडकर यांच्यासारखे विद्वान करवीर भूमीत राहावेत ही भावना

संदीप आडनाईक कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पन्हाळगडाशी जवळचे नातेसंबंध आहे. कामानिमित्त देशभरात अनेक त्यांनी मुक्काम केला, परंतु, राजर्षी शाहू महाराज यांच्याकडे त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार त्यांना ऐतिहासिक पन्हाळगडावर सव्वा एकर जागा मिळाली. पन्हाळा गिरिस्थान नगरपालिकेने डॉ. आंबेडकर स्मृतिउद्यान या नावाने ही जागा सध्याच्या विकास आराखड्यात आरक्षित केली आहे. या जागेसंदर्भातील प्रस्ताव सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहे.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ. आंबेडकर यांना ‘लोकमान्य’ पदवी, हयातीतच पुतळा उभारणी, करवीर इलाख्यात वकिलीची सनद आणि पन्हाळगडावर सव्वा एकर मोफत जागेचा वायदा केला होता. राजाराम महाराजांनी ८ मे १९२९ रोजी करवीर इलाख्यात त्यांच्या वकिलीच्या सनदीचे नूतनीकरण केले. शिवाय पन्हाळा येथील रिसनं ६५२/८ ब ही १ एकर ९ गुंठे जागा (४९५७.२ चौरस मीटर.) २६ जानेवारी १९३५ रोजीच्या मंजुरीने बक्षीसपत्राने दिली होती. वनखात्याकडून ही जागा डॉ. आंबेडकर या नावे वर्ग केली गेली आहे. आता या जागेवर सरकारी अशी नोंद आहे.

वाचा : माणगाव परिषदेचा डंका जगभर, हॉलीग्राफ शो मात्र बंद स्थितीतस्मारकासाठी लढाईदलितमित्र बापूसाहेब पाटील यांना या जागेसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यावर स्मारकाचे आरक्षण होते. परंतु १९८२ च्या विकास आराखड्यात त्यावर चक्क एका हॉटेलचे आरक्षण पडले. तत्कालीन समाज कल्याणमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या प्रयत्नातून माजी नगरसेवक चंद्रकांत गवंडी यांनी २००३ नंतर ते उठवले. आता नव्या आराखड्यात त्यांच्या नावे स्मृतिउद्यान आरक्षित करून ही जागा नगरपालिकेने जपली आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जागेची मागणीसध्या या जागेवर महसूलची नोंद आहे. ती जागा डॉ. आंबेडकर यांना बक्षीसपत्राद्वारे मिळाल्याने ती वारसा हक्काने मिळावी अशी भूमिका डॉ. आंबेडकर यांचे नातू भीमराव आणि प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dr. Ambedkar's one-acre land in Panhalgad: Memorial plans progress.

Web Summary : Dr. Ambedkar had close ties to Panhalgad. Rajarshi Shahu Maharaj gifted him land there. Currently, the land is reserved for a memorial garden. Prakash Ambedkar seeks inheritance rights to the land.