कोल्हापूर : आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलजवळील चौकात असणाऱ्या डीपीने शुक्रवारी सायंकाळी अचानक पेट घेतला. काही क्षणात मोठ्या ज्वाळा भडकल्या. त्यामुळे काही काळ नागरिकांची धावपळ उडाली. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत ही आग विझविली.
आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलजवळ महावितरणचा डीपी आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास त्याला आग लागली. त्यामुळे चौकातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडाली. नागरिकांनी रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद केली. तत्काळ अग्निशमन दलास वर्दी देण्यात आली. त्यानंतर काही मिनिटातच अग्निशमन दलाचे फायर फायटर आले. यावेळी अग्निशमन दलाच्या दस्तगीर मुल्ला, शिवाजी नलवडे, गिरीश पोवार, अभय कोळी व विशाल चौगुले या जवानांनी ही आग काही काळात आटोक्यात आणून विझविली. ही आग शार्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.
फोटो : २६०३२०२१-कोल-पार्वती टाॅकीज
ओळी : कोल्हापुरातील आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलजवळील डीपीला शुक्रवारी सायंकाळी अचानक आग लागली.
===Photopath===
260321\26kol_7_26032021_5.jpg
===Caption===
फोटो : २६०३२०२१-कोल-पार्वती टाॅकीज आेळी : कोल्हापूरातील आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलजवळील डीपीला शुक्रवारी सायंकाळी अचानक आग लागली.