(वापरू नये....) पर्सन ऑफ डे : तानाजी पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:18 AM2021-06-20T04:18:19+5:302021-06-20T04:18:19+5:30

विकासाची दृष्टी असणारे गडमुडशिंगीचे युवा नेतृत्व पाणी, गटर्स, रस्ते म्हणजे विकास, असे काहीसे आपल्याकडे सूत्र बनले आहे. मात्र, त्या ...

(Don't use ....) Person of the day: Tanaji Patil | (वापरू नये....) पर्सन ऑफ डे : तानाजी पाटील

(वापरू नये....) पर्सन ऑफ डे : तानाजी पाटील

Next

विकासाची दृष्टी असणारे गडमुडशिंगीचे युवा नेतृत्व

पाणी, गटर्स, रस्ते म्हणजे विकास, असे काहीसे आपल्याकडे सूत्र बनले आहे. मात्र, त्या पलीकडेही गावात विकास करता येतो, हे गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी कृष्णात पाटील यांनी दाखवून दिले. वीस हजार लोकसंख्येच्या गावाला विकासाचे मॉडेल बनवणे तसे अवघड असते. मात्र, त्यांनी हे शिवधनुष्य उचलले आणि त्यात ते यशस्वी ठरले.

करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराच्या जवळचे व लोकसंख्येने मोठे गाव म्हणजे गडमुडशिंगी, लहान गावाचा विकास झपाट्याने करता येतो. मात्र, मोठ्या गावांच्या समस्या, अडचणी वेगळ्या असतात. गडमुडशिंगीच्या जनतेने दहा वर्षांपूर्वी तानाजी पाटील यांच्यासारख्या युवा नेतृत्वावर विश्वास टाकला आणि जनतेच्या विश्वासाला पात्र राहून व ग्रामदैवत बिरोबा देवाच्या साक्षीने त्यांनी विकासाचे शिवधनुष्य उचलले. गावाला सक्षम व विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व मिळाल्यानंतर विकासाचा आलेख कसा चढता राहतो, हे तानाजी पाटील यांनी दाखवून दिले आहे. गावकऱ्यांना स्वच्छ व मुबलक पाणी, प्रशस्त रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, गटर्स, स्वच्छता या दैनंदिन गरजांची पूर्तता त्यांनी प्राधान्याने तर केलीच. त्याशिवायही काहीतरी वेगळे करता येईल का, याचा शोध त्यांनी कायम ठेवला. ग्रामपंचायतीचे प्रशासन सक्षम व गतिमान करत कामात सुसूत्रीपणा आणला. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत असतानाच त्यांना त्यानुसार औजारे उपलब्ध करून दिली पाहिजे. यासाठी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली ‘कृषी औजार बँक’ काढली. सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. कचरा उठावासाठी घंटागाडी, खेळाचे सुसज्ज टर्फ मैदान, सोलर, हायमास्ट दिवे, अंबाबाई मंदिर बांधकाम व सुशोभीकरण आदी कामे प्रभावीपणे केली.

मागील पाच वर्षांत खऱ्या अर्थाने गडमुडशिंगी विकासाच्या शिखरावर पोहोचली. राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असल्याने तानाजी पाटील यांनी माजी आमदार अमल महाडिक व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून गावासाठी निधी खेचून आणला. विकासनिधीबरोबरच ग्रामस्थांना व्यक्तिगत लाभाच्या विविध योजना त्यांनी प्रभावीपणे राबवल्या. प्रत्येक योजना आपल्या गावात कशी आणता येईल, यासाठी त्यांची नेहमी धडपड असते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करण्याची त्यांची पद्धत आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा गडमुडशिंगीच्या जनतेने त्यांना सत्ता दिली. सत्ता ही सामान्य माणसाच्या कल्याणासाठी असते, हे त्यांनी कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. ग्रामपंचायतीच्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांचा सामान्य माणसावर विश्वास होता. ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांनी तगडे आव्हान उभे केले होते. पाच वर्षांत उभा केलेला विकासाचा डोंगर, सामान्य, गोरगरीब माणसाचे पाठबळ आणि स्वर्गीय शिवाजीराव पाटील (दादा) यांच्या विचारांची भक्कम साथ यावर हे आव्हान त्याच ताकदीने परतावून लावत त्यांनी सत्ता ताब्यात ठेवली.

विकासाच्या नवीन पॅटर्नचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी सत्तेची सूत्रे हातात घेतली. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विकासकामांवर काहीशा मर्यादा आल्या आहेत. तरीही ते थांबले नाहीत, विविध योजनांची अंमलबजावणी सुरू असतानाच, गडमुडशिंगी येथे काेरोना सेंटर सुरू करून गोरगरिबांना आधार देण्याचे काम केले. अल्पावधीतच आपल्या कार्यकर्तृत्वाने गडमुडशिंगीचा विकासपुरुष म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कामाची दखल राज्यपातळीवर घेतली. महाराष्ट्र राज्य उपसरपंच परिषदेचे उपाध्यक्षपद त्यांच्यावर सोपवून त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची पोहोचपावती दिली.

संघर्षातून तावून- सुलाखून निघालेले नेतृत्व

गडमुडशिंगीच्या राजकारणात पाय रोवून उभे राहणे तसे अवघड काम होते. मात्र, स्वर्गीय शिवाजीराव कृष्णात पाटील (दादा) यांच्या विचारांचा वारसा घेऊन तानाजी पाटील यांनी राजकारणात पाऊल ठेवले. स्वच्छ चारित्र्य, सामान्य माणसाबद्दलची कणव त्यांच्याकडे असल्याने त्यांनी राजकारणावर लवकर पकड निर्माण केली. संघर्ष हा त्यांच्या जीवनात कायम राहिला, जिल्हा परिषद निवडणुकीत अपयशही आले. मात्र, ते खचले नाहीत. सामान्य माणूस त्यांच्यासोबत राहिल्याने त्यांनी राजकारणावरील पकड अधिकच घट्ट केली.

पंचगंगेतून थेट पाइपद्वारे पाणी

गावाचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याने गावविहिरीतून पाणी अपुरे पडत होते. यासाठी त्यांनी थेट पंचगंगा नदीवरून पाइपलाइन आणून गावकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर ए.टी.एम. बसवून आधुनिक पाऊल टाकले.

स्पर्धा परीक्षेतही झेंडा

ग्रामीण भागातील तरुणांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी प्रथमच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुसज्ज ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. गावातील चार मुलांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षेत चांगले यश संपादन करून ते शासकीय सेवेत दाखल झाले. गडमुडशिंगी गावचे नाव उज्ज्वल केले. याकामी तानाजी पाटील यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.

Web Title: (Don't use ....) Person of the day: Tanaji Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.