शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

घरात बसू नका, मास्क वापरू नका, आरोग्य प्रशिक्षणामध्ये वक्त्यांची मुक्ताफळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 10:48 IST

coronavirus, kolhapurnews, zp, training कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रेरणा देण्यासाठी पाठविलेल्या अमोल आचरेकर याने कोरोना ही साथ नाही, मास्क वापरण्याची गरज नाही, घरातून बाहेर पडा, घरातच बसू नका अशी मुक्ताफळे उधळली आहेत.

ठळक मुद्देघरात बसू नका, मास्क वापरू नका, आरोग्य प्रशिक्षणामध्ये वक्त्यांची मुक्ताफळेप्रशिक्षकाचे प्रशिक्षण, महिला डॉक्टरना अपशब्द

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रेरणा देण्यासाठी पाठविलेल्या अमोल आचरेकर याने कोरोना ही साथ नाही, मास्क वापरण्याची गरज नाही, घरातून बाहेर पडा, घरातच बसू नका अशी मुक्ताफळे उधळली आहेत.

करवीर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे मार्गदर्शन सुरू असून गेले सहा महिने रात्रीचा दिवस करून अधिकारी, कर्मचारी करत असलेल्या कामावर पाणी फिरविण्याचे काम या व्यक्तीकडून सुरू आहे.तोंडी तक्रार करूनही या प्रशिक्षकाचे प्रशिक्षण बंद केले नसल्याने करवीर तालुक्यातील डॉक्टर्सनी सोमवारी डॉ. योगेश साळे यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. वडणगे, भुये, कणेरी, इस्पुर्ली, उचगाव, हसूर आणि मुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.आचरेकर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन आपण कोरोनाच्या काळामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जावून प्रेरणादायी विचार मांडतो म्हणून परवानगी मिळविली. चांगले मानसिक समुपदेशन होईल यासाठी देसाई यांनीही त्यांना यासाठी परवानगी दिली आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली.

आचरेकर पथक घेऊन ३० सप्टेंबरला मुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्यांनी डॉ. रिझवाना मुल्ला यांना अपमानास्पद वागणूक दिली. मी जागेवर तुम्हाला निलंबित करू शकतो. अशी दमबाजी केली. डॉ. मुल्ला यांचा त्यांनी लोकांसमोरच तीन ते चारवेळा शट अप म्हणून अपमान केला.

डॉ. मुल्ला यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्याकडे तक्रार केली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना हा प्रकार समजल्यानंतर आचरेकर याने मित्तल यांची माफी मागितली.ड्रायफ्रूटस कुठे आहेत?जेथे जातील तिथे ही व्यक्ती ड्रायफूट, जेवणाची व्यवस्था केली आहे का, अशी पहिली विचारणा करते. वडणगे प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यावर त्यांनी ड्रायफ्रूटची विचारणा केली. ड्रायफ्रूट मिळत नाहीत म्हटल्यावर ज्यूसची मागणी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर