शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

हद्दवाढ नकोच, दोन हजार कोटींचा निधी द्या; कोल्हापूर हद्दवाढ विरोधी कृती समितीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 13:25 IST

लादल्यास तीव्र लढा उभारू

कोल्हापूर : राज्य सरकारने कोल्हापूर शहरालगतच्या गावांवर हद्दवाढ लादण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या विरोधात तीव्र लढा नव्याने उभारला जाईल, असा इशारा सर्व पक्षीय हद्दवाढ विरोधी समितीने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.४२ गावांच्या सुनियोजित विकासासाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणला दोन हजार कोटींचा निधी राज्य सरकारने द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. हद्दवाढ विरोधी सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष व उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडेकर, मोरेवाडीचे सरपंच ए. व्ही. कांबळे, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, गडमुडशिंगीच्या सरपंच अश्विनी अरविंद शिरगावे, वळीवडेचे रणजितसिंह कुसाळे, पाचगावचे सदस्य नारायण गाडगीळ, मोरेवाडीचे सदस्य अमर मोरे, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले यांनी एकत्रित भूमिका मांडली. कोल्हापूर शहराची परिस्थिती पाहता शहरामध्ये ५० वर्षांत कोणत्याही समाधानकारक मूलभूत सुविधा महानगरपालिका नागरिकांना देऊ शकलेली नाही. त्याच्या या उणिवा शहरवासीयांना दैनंदिन जीवनावर परिणाम करत आहेत. शहराचा सुनियोजित विकास करण्यात महानगरपालिका अजून समक्ष नाही. त्यामुळे वाढीव हद्दीतील गावांचा विकास महानगरपालिका करू शकणार नाही.आज जी उपनगरांची दैवनीय अवस्था आहे तीच आमच्या गावांचीही होणार असल्याने आमचा हद्दवाढीस विरोध असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. महापालिकेने विकासाचे एकही काम नीट केल्याचा अनुभव नाही. सध्या शंभर कोटींतील रस्त्यांचा अनुभव शहरवासीय घेतच आहेत. दैनंदिन स्वच्छतेपासून अनेक प्रश्न लोकांना भेडसावत असताना हद्दवाढ करून गावांचे स्वास्थ्य बिघडू नये, असे म्हणणे त्यांनी मांडले.कोल्हापूरला काही महिन्यांपूर्वी ४५०० कोटींचा विकास निधी मिळाला. या कामांची उद्घाटने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी राज्य सरकार कोल्हापूर शहरासाठी देऊन शहरातील प्रश्न मार्गी लावत असेल तर प्राधिकरणमध्ये समाविष्ट असलेल्या ४२ गावांकरिता सुद्धा दोन हजार कोटी निधी राज्य सरकारने देऊन आमच्याही गावांचा शाश्वत विकास करावा, अशी मागणी असल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर