शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

लॉकडाऊनमुळे टिंबर मार्केट ‘डाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 14:15 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय संकटात आले आहेत. यामध्ये टिंबर मार्केटचाही समावेश आहे. गेल्या ४८ वर्षांत प्रथमच टिंबर मार्केट महिनाभर बंद आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींचा फटका : प्रथमच महिनाभर मार्केट बंद : साडेतीन हजार लोकांवर उपासमारीची वेळ

विनोद सावंत

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे टिंबर मार्केटलाही फटका बसला आहे. गेल्या महिन्यापासून येथील कामकाज ठप्प असून कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यावर अवलंबून असणाऱ्या साडेतीन हजार लोकांसमोर आर्थिक संकट आहे. टिंबर मार्केटच्या स्थापनेपासून प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली आहे.तत्कालीन आयुक्त द्वारकानाथ कपूर यांनी १९७२ च्या सुमारास स्वतंत्र जागा आरक्षित करून टिंबर मार्केट सुरू केले. माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, चंद्रकांत साळोखे आणि एन. डी. जाधव यांंच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले. यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय संकटात आले आहेत. यामध्ये टिंबर मार्केटचाही समावेश आहे. गेल्या ४८ वर्षांत प्रथमच टिंबर मार्केट महिनाभर बंद आहे.

सुतारकाम करणारे हवालदिलटिंबर मार्केट बंद असल्यामुळे येथील वखारींमध्ये तसेच घरगुती काम करणारे, सुतारकाम करणाºया शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बँकेतील शिल्लक रकमेवर तसेच मित्रमंडळींच्या सहकार्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू असून दानशूर व्यक्तींनी त्यांना मदत करण्याची गरज आहे.

‘बांधकाम ठप्प’चाही परिणामबांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली म्हणजे टिंबर मार्केट येथे उपलब्ध होते. लॉकडाऊनमुळे बांधकाम थांबल्यामुळे टिंबर मार्केट येथील व्यवसायही ठप्प आहे.टिंबर मार्केटमध्ये एकूण कारखाने - १७०मोठे कारखाने - ५०टिंबर मार्केटवर आवलंबून नागरिक - ३५००हमाल - ५०टेम्पोचालक - १००-------------------------------------------------------------टिंबर मार्केटमध्ये विक्री- सेंट्रिंग साहित्य- लाकडी खिडकी, चौकट- स्लाइडिंग खिडकी- फरशी, सिमेंट सळी- प्लायवूड- फायबरच्या वस्तू- बांबू, पायाड- बॅटन, तट्टे, निलगिरी सर 

 

लॉकडाऊनमुळे बांबू विक्री ठप्प असून यावर अवलंबून असणाºया सुतार, सेंट्रिंग कामगारांनाही फटका बसला आहे. विक्रीच बंद असल्यामुळे उत्पन्न थांबले असून घरखर्च कसा करायचा, हा प्रश्न आहे.- महेश सूर्यवंशी, बांबू व्यापारी, टिंबर मार्केटटिंबर मार्केट महिनाभर बंद राहण्याचीही पहिलीच वेळ आहे. मार्केटवर अवलंबून असणारे व्यापारी, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हा टिंबर असोसिएशन, कोल्हापूर टिंबर कॉर्पोरेशन (बांबू व्यवसाय) यांच्यामार्फत कामगारांना धान्य वाटप केले. सामाजिक बांधीलकी म्हणून पोलीस, डॉक्टरांनीही मदत केली.- लक्ष्मण पटेल, सहसचिव, कोल्हापूर जिल्हा टिंबर असोसिएशन 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस