येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेला तुकाराम चौक हा शहराचे वैभव आहे. याठिकाणी प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण, विविध समाजिक राजकीय, धार्मिक कार्यक्रम पार पडतात. स्मृती स्तंभाच्या समोर मोठे व्यासपीठ आहे. सध्या या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरण सुरू आहे. यामध्ये संपूर्ण परिसराला तीन फूट उंचीची भिंत बांधून समोर हिरवळ करण्याचा प्रयत्न पालिकेचा आहे.
पण निवेदनामध्ये नागरिकांनी भिंतीमुळे सर्वच कार्यक्रमाला अडथळा येणार असून, हिरवळीच्या ऐवजी पेविंग ब्लॉक बसवावेत तसेच ही भिंत बांधू नये अशी मागणी केली आहे. बाकीच्या सुशोभीकरणास आपला विरोध नसल्याचे ही सांगितले आहे. हे निवेदन कार्यलयीन अधिकारी स्नेहल पाटील यांनी स्वीकारले.
निवेदनावर माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, गजानन साळोखे, दत्तात्रय साळोखे, गणपती बारड, राजेंद्र चव्हाण, अनंत सावर्डेकर, मयूर सावर्डेकर, शंकर रावण, सुधीर सावर्डेकर, नामदेव भांदीगरे, संदीप भारमल, रणजित भारमल यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.
फोटो ओळ : मुरगूड, ता. कागल येथील हुतात्मा तुकाराम चौकातील संरक्षण भिंतीचे काम थांबवावे, अशा मागणीचे निवेदन नगर परिषद कार्यालयीन अधिकारी स्नेहल पाटील यांना देताना दिग्विजय पाटील, सुधीर सावर्डेकर, राजेंद्र चव्हाण आदी.