शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अफवांवर विश्वास ठेऊ नका, पन्हाळ्याची शासकीय कार्यालये कुठेही जाणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 16:51 IST

Fort Panhala Flood Kolhapur : पन्हाळा शहरात संपुर्ण तालुक्याची सर्व कार्यालये आहेत. रस्ता खचला म्हणुन ही कार्यालये वाघबिळ येथे हलविण्याची मागणी होत असली तरी अशी कार्यालये बाहेर नेता येत नाहीत, त्याला राज्य शासनाची परवानगी लागते अशी माहिती तहसीलदार रमेश शेंडगे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

ठळक मुद्देअफवांवर विश्वास ठेऊ नका, पन्हाळ्याची शासकीय कार्यालये कुठेही जाणार नाहीततहसीलदार शेंडगे यांची माहीती, पन्हाळ्यावरील रस्त्याचे काम सुरु

नितीन भगवानपन्हाळा : पन्हाळा शहरात संपुर्ण तालुक्याची सर्व कार्यालये आहेत. रस्ता खचला म्हणुन ही कार्यालये वाघबिळ येथे हलविण्याची मागणी होत असली तरी अशी कार्यालये बाहेर नेता येत नाहीत, त्याला राज्य शासनाची परवानगी लागते अशी माहिती तहसीलदार रमेश शेंडगे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सुरु केल्याने पुढील दोन ते तीन महिन्यात पन्हाळ्यावरील सर्व व्यव्हार सुरु होतील असे नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी सांगितले.२३ जुलै रोजी पन्हाळ्याचा रस्ता खचला. त्यामुळे पन्हाळकर तर अडकलेच परंतु अनेक शासकीय कार्यालये बंद राहिली. त्यामुळे पन्हाळ्याच्या बाहेरून येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर येता न आल्याने शासकीय कामकाजहि बंद राहिले.दरम्यान, पन्हाळ्यावर अशा प्रकारचे रस्ता संकट वारंवार घडु लागल्याने आता शासकिय कार्यालये वाघबिळ येथे जाणार, अशी अफवा पसरली आहे. मात्र या बाबत माजी आमदार सत्यजित पाटील यांनी या प्रकाराला आपला विरोध दर्शविला.

असा प्रकार जाणीवपूर्वक कोणी करत असतील तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगुन ही कृती हाणुन पाडेन. यापेक्षा पन्हाळ्यावर येण्या- जाण्यासाठी प्रस्तावित उड्डाण पुल लवकरात लवकर कोणत्या पद्धतीने पुर्ण होइल यासाठी सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाशी पाठपुरावा करत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.शासकिय कार्यालये इतरत्र हलविण्यास गावकऱ्यांचा विरोध असुन असे कांही होत असल्यास आपण न्यायालयीन दाद मागु असा इशारा माजी नगरसेवक सतीश भोसले यांनी दिला आहे.

खरतर पन्हाळा शहराने इतिहास काळापासुन राजधानीचे वैभव पाहिले आहे. यात भोजराजापासुन छत्रपती ताराराणीपर्यंत या ठिकाणी सर्व कार्यालये होती, ती तशीच पुढे चालु आहेत. रस्त्याचा प्रश्न हा तात्पुरता आहे, यामुळे शासकिय कार्यालये पन्हाळा शहरातुन बाहेर जावीत असे कुणाच्या मनात नसताना ही अफवा उठवण्याचा नतद्रष्ट मंडळींचा कोणता हेतु आहे, हे समजुन येत नाही.

पन्हाळ्यावरील रस्त्याचे काम सुरुदरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सुरु झाले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात पन्हाळ्यावरील सर्व व्यव्हार सुरु होतील असे नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी सांगितले.

 

टॅग्स :Fortगडfloodपूरkolhapurकोल्हापूर