शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

कुत्री मेली, मासे मरताहेत, आता माणसं मरायची वाट..!; पंचगंगा प्रदूषणचा प्रश्न भयावह

By समीर देशपांडे | Updated: April 10, 2026 13:59 IST

उपाययोजनेच्या घोषणा निवडणुकीपुरत्याच; न्यायालयाच्या निर्देशांनंतरही कार्यवाही कागदावरच

समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : प्रत्येक वर्षी जानेवारी महिना संपत आला की नदीतील मासे मरायला सुरुवात होते, कुत्री नदीत मरून पडली तरी यंत्रणा लक्ष देत नाहीत. हेच पाणी कोल्हापूरच्या खाली असलेली गावे पितात. कुत्री मेली, मासे मरताहेत, आता माणसं मरायची वाट पाहताय का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. गेली अनेक वर्षे पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकांच्या आणि भाषणातील घोषणेपुरताच उरला असून याच्या उपाययोजना म्हणजे केवळ मलमपट्टी असल्याची टीका होत आहे. 

वास्तविक गेल्या २५ वर्षांपासून पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न सुरू झाला याबाबत उच्च न्यायालयात २०१२ मध्ये जनहित याचिका दाखल झाली तेव्हा न्यायालयाच्या निर्देशानुसार पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या आणि प्रमुख अधिकारी, लोकप्रतिनिधी बैठका झाल्या. परंतु तुटपुंज्या निधीच्या जोरावर अळू लावणे आणि बंधारे घालणे, दूषित पाण्याचे नमुने घेणे, पंचनामे करणे आणि अहवाल, नोटिसा पाठवणे या पलीकडे काहीही होत नसल्याची सार्वत्रिक तक्रार आहे.

नदीकाठाला अनेक औद्योगिक वसाहती आहेत. साखर कारखाने आहेत. यातून दिवसाढवळ्या रसायनयुक्त पाणी पंचगंगेत मिसळत आहेत. त्यामुळेच पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि मासे मरायला सुरुवात होते. दरवर्षी हे चित्र दिसत असूनही नेतेमंडळी हे चित्र गांभीर्याने न घेता उलट गणेशमूर्ती नदीतच धरण्याचा आग्रह धरण्यात येतो. पर्यावरणविषयक कायदे आणि नियम याचा आधार घेत रसायनयुक्त पाणी आणि सांडपाणी सोडणाऱ्या आस्थापना आणि संस्था यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत या स्थितीत सुधारणा होणार नाही. ती धमक शासन दाखवणार हा हाच खरा प्रश्न आहे.

दृष्टिक्षेपात पंचगंगा खोऱ्यातील वसाहती

महानगरपालिका २: कोल्हापूर, इचलकरंजी

नगरपरिषदा/नगरपालिका ४ : हुपरी, हातकणंगले, शिरोळ, कुरुंदवाड 

औद्योगिक वसाहती ८: शिवाजीउद्यामनगर कोल्हापूर, पुलाची शिरोली, गोकुळ शिरगाव, जवाहरनगर, आकिवाटे उद्योग क्षेत्र, पार्वती उद्योग क्षेत्र यड्राव, इचलकरंजी शहर प्रक्रिया, लक्ष्मी उद्योग क्षेत्र तिळवणी

साखर कारखाने ७ : दत्त साखर कारखाना आसुर्ले पोर्ले, डी. वाय. पाटील साखर कारखाना असळज, कुंभी कासारी साखर कारखाना कुडिओ, भोगावती साखर कारखाना परिते, राजाराम साखर कारखाना कसबा बावडा, पंचगंगा साखर कारखाना इचलकरंजी, दत्त साखर कारखाना शिरोळ

दिवसाढवळ्या रसायनयुक्त पाणी, सांडपाणी पंचगंगेत मिसळते त्यामुळेच मासे मरायला सुरुवात होते. २५ वर्षांपासून पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न सुरू झाला आणि आता तो गंभीर बनला आहे. याबाबत उच्च न्यायालयात २०१२ मध्ये जनहित याचिका दाखल झाली तेव्हा न्यायालयाच्या निर्देशानुसार पंचगंगा नदीं प्रदूषणमुक्तीबाबत अधिकाऱ्यांच्या शेकडो बैठका झाल्या. मात्र निष्पन्न काही व्याले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Polluted Panchganga River: Fish, Dogs Dead; Humans Next?

Web Summary : Panchganga river pollution worsens; fish and dogs die. Citizens question inaction as industrial waste contaminates water. Court orders and meetings yield little improvement. Action is needed.
टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणkolhapurकोल्हापूर