पंधरा दिवसांपूर्वी एका पिसाळलेल्या कुत्र्याने पाटील यांच्या पाळलेल्या कुत्र्यावर हल्ला केला यावेळी त्याला वाचवण्यासाठी बाजीराव यांनी प्रयत्न केला. यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने बाजीराव यांच्या गालाला चावा घेतला.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेवकांनी २४ तासांच्या आत सीपीआरमध्ये जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडून लस घ्यावी, असा सल्ला दिला होता. पण गावातीलच एका खासगी डॉक्टरने आपण स्वत: लस विकत आणून संध्याकाळी देऊ असे सांगितले. यामुळे रेबिजचे विषाणू वेगाने वाढून अगदी पंधरा दिवसांमध्ये त्यांचा मृत्यू झाला. चार महिन्यांपूर्वीच त्यांच्या मोठ्या भावाचे निधन झाले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबांची जबाबदारी बाजीराव यांच्यावरती होती. बाजीराव यांच्या मृत्यूने आता घरी कर्ता पुरुष कुणी ही उरला नसून पाटील कुटुंबीयावरती संकट कोसळले आहे. गावातील गहिनीनाथ पाणीपुरवठा संस्थेमध्ये ते पंचवीस वर्षे सचिव म्हणून काम पाहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, भावजय, पुतण्या असा परिवार आहे.
डॉक्टरचे अज्ञान
खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरच्या अज्ञानीपणामुळे एका सुज्ञ नागरिकाचा बळी गेला आहे. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या रुग्णावर कसे उपचार केले जातात याची पद्धत माहीत नसल्याने खासगी डॉक्टरच्या चुकीच्या सल्ल्यामुळे एका कुटुंबावरती संकट कोसळले आहे.