शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

हल्ले, खंडणीप्रकरणी डॉक्टरांनी तक्रारी द्याव्यात : प्रेरणा कट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:24 IST

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ‘वुमन्स डॉक्टर विंग’ यांच्या वतीने कट्टे, राज्यातील पहिल्या जिल्हा शल्यचिकि त्सक डॉ. कुसुम वाळुंजकर आणि टेबिलटेनिसपटू शैलजा साळोखे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देकट्टे यांच्यासह कुसुम वाळुंजकर, शैलजा साळोखे यांचा सत्कार

कोल्हापूर : डॉक्टरांवर हल्ले आणि खंडणी मागणीचे प्रकार वाढले असून, संबंधितांविरोधात तक्रार देण्यासाठी डॉक्टरांनी पुढे येण्याची गरज असल्याचे मत शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी मंगळवारी व्यक्त केले.इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ‘वुमन्स डॉक्टर विंग’ यांच्या वतीने कट्टे, राज्यातील पहिल्या जिल्हा शल्यचिकि त्सक डॉ. कुसुम वाळुंजकर आणि टेबिलटेनिसपटू शैलजा साळोखे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सत्काराला उत्तर देताना कट्टे बोलत होत्या. ‘नीमा वुमन्स फोरम’ यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कट्टे म्हणाल्या, डॉक्टर्स आणि पोलिसांचे काम २४ तासांचे असते. आम्हांला जनतेच्या संरक्षणाचे काम करावे लागते; तर डॉक्टरना रुग्णांचे आरोग्य सांभाळावे लागते. समाजाच्या भल्यासाठी आपण कार्यरत असतो; परंतु किरकोळ कारणांवरून डॉक्टरांना त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये राजकीय दबाव न घेता डॉक्टरांनी तक्रारी द्याव्यात.डॉ. कुसुम वाळुंजकर म्हणाल्या, ज्यावेळी जिल्हा आरोग्याधिकारी म्हणून महिला डॉक्टरकडे कार्यभार देताना दहादा विचार व्हायचा, अशावेळी मला राज्यातील पहिली महिला जिल्हा शल्यचिकि त्सक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सध्या डॉक्टरांकडे पाहण्याचा समाजाचा बदलता दृष्टिकोन चिंताजनक वाटत आहे.

शैलजा साळोखे म्हणाल्या, ज्यावेळी पुरुषही मोठ्या संख्येने टेबलटेनिस खेळत नव्हते तेव्हा मी या खेळामध्ये उतरले आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत यश मिळविले, याचा कोल्हापूरकर म्हणून मला अभिमान आहे. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप साळोखे यांनी महिला डॉक्टरांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग वाढवावा, असे आवाहन केले. यावेळी डॉ. मुकुंद मोकाशी, डॉ. आशा जाधव, डॉ. मधुरा कुलकर्णी, डॉ. क्रांती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. गायत्री होशिंग, डॉ. राजेंद्र वायचळ उपस्थित होते. डॉ. मंजिरी वायचळ यांनी सूत्रसंचालन केले.

  • दोघांनाही मूळ शोधावे लागते

डॉक्टर म्हणून तुम्हाला आरोग्याच्या निर्माण झालेल्या प्रश्नाचे, तर आम्हांला घडलेल्या गुन्ह्याचे मूळ शोधावे लागते. दोघांचाही व्यवसाय, नोकरी मूळ शोधण्याचाच आहे, असे प्रेरणा कट्टे यांनी सांगताच त्याला सर्वांनीच प्रतिसाद दिला. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस