शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वरकुटे-मलवडीत डॉक्टर, तलाठी पाहिजेच..!- लोकमतचा दणका..

By admin | Updated: July 25, 2014 22:13 IST

सुविधा पुरवा : चार गावांच्या ग्रामस्थांचे अडीच तास ‘रास्ता रोको’

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, कुरणेवाडी, महाबळेश्वरवाडी या गावांसाठी कायमस्वरूपी गावकामगार तलाठी आणि दवाखान्यात डॉक्टरची नेमणूक करण्याच्या मागणीसाठी शेतकरी व तरुण कार्यकर्त्यांनी अडीच तास ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. ग्रामस्थांनी आपल्या सगळ्या मागण्या मान्य करून घेतल्या. वरकुटे-मलवडीसह चार गावांचे तलाठी कार्यालय वरकुटे-मलवडी येथे आहे. मात्र, गेले वर्षभर पूर्णवेळ काम करणारा गावकामगार तलाठी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांची कामे रखडली आहेत. शिवाय या चार गावांतील सर्वसामान्य ग्रामस्थांना वैद्यकीय सेवा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आणि वरिष्ठांना भावना कळविण्यात आल्या. या दोन्ही समस्या ‘लोकमत’ने प्रभावीपणे मांडल्या होत्या. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता वरकुटे-मलवडी एसटी थांबा चौकात चार गावांतील शेतकरी आणि कार्यकर्ते जमले. शांततेच्या मार्गाने ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले. साडेअकरा वाजता म्हसवडचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. कोरे यांच्यासमवेत आलेल्या महसूल अधिकाऱ्यांनी तलाठी म्हणून अमित शांताराम कुकडे यांची नियुक्ती प्रांताधिकाऱ्यांनी केल्याचे जाहीर केले. तसे नियुक्तिपत्र ग्रामस्थांना वाचून दाखविण्यात आले. सध्या पदभार स्वीकारलेले तलाठी सुरेश बदडे यांनी एक आॅगस्टला नवीन तलाठी रुजू होईपर्यंत तलाठी कार्यालयात थांबून शेतकऱ्यांची कामे करण्याची ग्वाही दिली. पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांनी आयुर्वेदिक दवाखान्यात डॉक्टरांच्या नियुक्तीसंदर्भात सविस्तर माहिती दिली आणि वरकुटे-मलवडी येथे आरोग्यसेविका पूर्णवेळ थांबून रुग्णांची देखभाल करतील, असे ग्रामस्थांना सांगितले. तसेच दवाखाना आजपासून दररोज उघडला जाईल, याचीही हमी दिली. शुक्रवार हा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने डॉ. कोडलकर यांनी दुपारपासून अर्धा दिवस गावातील आयुर्वेदिक दवाखान्यात थांबून गरजू रुग्णांची सेवा करण्याचे आश्वासन दिले. आंदोलनावेळी मंडलाधिकारी एम. एम. कुलाळ, तलाठी परदेशी, हंगामी तलाठी सुरेश बदडे, आरोग्य विस्तार अधिकारी प्रशांत सातपुते, आरोग्य सहायक विनायक कुलकर्णी, एस. डी. भंडारे, ए. डी. लाहुडकर, आरोग्य सेविका लतिका जाधव उपस्थित होत्या. शासकीय कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कोणताही त्रास दिला जाणार नाही, तळीरामांनी गोंधळ केल्यास त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल कारवाई करावी, असे आश्वासन ग्रामस्थांनी एकमुखाने दिले. म्हसवडचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. कोरे यांनी शिष्टाई केल्यामुळे अडीच तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दादासाहेब शिंगाडे, भारत अनुसे, बापूसाहेब बनगर, वैभव शिंगाडे, विजयकुमार जगताप, साहेबराव खरात, सुभाष जगताप, भारत बनसोडे, अमोल जगताप, दत्ता चव्हाण, रणजित जगताप यांच्यासह चार गावांतील ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले. (प्रतिनिधी)‘लोकमत’कडून सतत पाठपुरावावरकुटे-मलवडीसह चार गावांच्या समस्यांबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. दि. १७ जुलैच्या अंकात ‘तलाठ्याविना शेतकरी अडचणीत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले, तर दि. २४ जुलैच्या अंकात ‘गोदामात दवाखाना’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. राजकीय आधार नको!कोणत्याही पक्षाच्या छोट्या-मोठ्या नेत्यांचा आधार झुगारून या आंदोलनात सामान्य जनता सहभागी झाली आणि राजकीय पाठिंब्याशिवाय आंदोलन यशस्वी करून दाखविले. यापुढील काळात समाजाच्या विकासासाठी सर्व जणांनी एकत्र येऊन गावाचा विकास साधायचा, असा निर्णय ग्रामस्थांनी एकमुखाने घेतला.