शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

कुटुंबाप्रमाणे उमेदवारांचे काम करा

By admin | Updated: February 1, 2017 23:07 IST

नारायण राणे : वेंगुर्लेत काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा; इच्छुक उमेदवारांचा घेतला आढावा

वेंगुर्ले : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये १०० टक्के यश मिळविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा. काँग्रेस पक्ष हे आपले एक कुटुंब आहे. या कुटुंबातील इच्छुक सर्वच उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट मिळणार नाही, पण तिकीट न मिळालेल्या उमेदवारांनी नाराज न होता पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करावा. तुमच्या प्रामाणिकपणाची व निष्ठेची पक्ष नक्कीच दखल घेईल, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ले येथील पदाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान केले. वेंगुर्ले येथे हॉटेल कोकण किनारामध्ये तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांबरोबर आयोजित केलेल्या बैठकीमध्ये नारायण राणे बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निकिता परब, तालुकाध्यक्ष मनीष दळवी, विभागीय अध्यक्ष विलास ठाकूर, राजबा सावंत, देऊ साळगावकर, मनवेल फर्नांडिस, प्रकाश राणे, माजी महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, नीलेश सामंत, दादा कुबल, समीर नाईक, जयप्रकाश चमणकर, वंदना किनळेकर, सारिका काळसेकर, वसंत तांडेल, जगन्नाथ डोंगरे, चित्रा कनयाळकर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रीतेश राऊळ, बाळू परब, नगरसेवक विधाता सावंत, कृतिका कुबल, शीतल आंगचेकर, पूनम जाधव आदींसह तालुक्यातील पदाधिकारी, इच्छुक उमेदवार यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान प्रथम राणे यांनी प्रत्येक विभागीय अध्यक्षांकडून त्या त्या भागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुक उमेदवारांची माहिती जाणून घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करावी की नाही याबाबतही काहींनी आपली मते मांडली. तर तालुकाध्यक्ष दळवी यांनी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समितीच्या निवडणुकीत आपण जे उमेदवार द्याल, त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उपस्थितांचे आभार वसंत तांडेल यांनी मानले. (प्रतिनिधी)सरकारची फसवेगिरी लोकांना सांगाम्हणूनच या निवडणुकीच्या प्रचाराला जाताना सरकारची फसवेगिरी लोकांना सांगा. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अंतिम उमेदवार निवडीची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता आहे, अशांनाच काँग्रेस पक्षाचे तिकीट दिले जाणार आहे. मात्र, ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांनी नाराज होऊ नये. तुमचाही विचार भविष्यात पक्ष नक्की करेल, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्याचा विकास थांबला आहेसर्वांची मते जाणून घेतल्यानंतर व इच्छुक उमेदवारांबाबत माहिती घेतल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी सत्तास्थाने आजही काँग्रेसकडे आहेत. या जिल्ह्यातील जनतेचा आपल्यावर विश्वास आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रचाराला जाताना मोदी लाटेची हवा येऊन केंद्र्रात व राज्यात सत्तेत आलेल्या सेना-भाजपच्या सरकारमुळे जनतेचे कसे नुकसान होत आहे, हे त्यांना पटवून सांगा. नोटाबंदीच्या नावाखाली झालेल्या कारवाईत सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागला. आजही स्वत:चे बँकेतील पैसे काढण्यासाठी या सरकारने मर्यादा ठेवल्या आहेत. अशी कारवाई करणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. या नोटाबंदीमुळे बाजारपेठा मंदीच्या छायेत आहेत. व्यापार, उद्योग थांबले आहेत. सरकारची ही चुकीची धोरणे लोकांना जाऊन सांगा. सिंधुदुर्ग हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे, पण या जिल्ह्याचा विकास थांबला आहे.