शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कलाकारांचे तहसिल कार्यालयासमोर उपोषण, आश्वासनानंतर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 17:35 IST

culture, kolhapurnews, artist, uposhan कोरोनामुळे गेली सहा महिने एकही कार्यक्रम झालेला नाही. घरातील माणसांची पोटं कशी भरायची हा प्रश्न आता समोर आहे. तेव्हा कलाकार मंडळींना दिलासा देण्यासाठी, आमची पोटं भरण्यासाठी काही तरी करा या मागणीसाठी कलापथक निर्माता असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी करवीर तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.

ठळक मुद्देकलाकारांचे पोट भरण्यासाठी काही तरी कराकलापथक निर्माता असोसिएशनचे तहसिल कार्यालयासमोर उपोषण

कोल्हापूर : कोरोनामुळे गेली सहा महिने एकही कार्यक्रम झालेला नाही. घरातील माणसांची पोटं कशी भरायची हा प्रश्न आता समोर आहे. तेव्हा कलाकार मंडळींना दिलासा देण्यासाठी, आमची पोटं भरण्यासाठी काही तरी करा या मागणीसाठी कलापथक निर्माता असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी करवीर तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. सायंकाळी सांस्कृतिक राज्यमंत्री  डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या आश्वासनानंतर कलापथक असोसिएशनचे उपोषण मागे घेण्यात आले.सकाळी करवीर तहसिल कार्यालयासमोर शाहीरविशारद डॉ आझाद नायकवडी यांच्या हस्ते नटराज पूजन करून कोरोनामुळे मृत्यु पावलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कलापथक निर्माता असोसिएशनचे अध्यक्ष मुकुंद सुतार, उपाध्यक्ष शारदा हिलगे, निर्माता रमेश खटावकर, कलाकार संघटनेचे अध्यक्ष विश्वास ढाले हे उपोषणाला बसले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी कलापथकातील कलाकार, साउंट सिस्टीम मालक, मंडप मालक, गायक व नाट्यकलाकार, विविध लोककलांमधील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, कलापथक असोसिएशनच्या उपोषणाची सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दखल घेतली. त्यांनी सायंकाळी चार वाजता करवीर तहसीलदार कार्यालयासमोर येऊन आंदोलनाला भेट दिली.

कलाकारांच्या सर्व मागण्या यावेळी त्यांनी समक्ष ऐकल्यानंतर कलाकार मंडळींना लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.  यावेळी डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर,शाहीरविशारद डॉ. आझाद नायकवडी, कलापथक असोसिएशनचे अध्यक्ष मुकुंद सुतार, उपाध्यक्ष शारदा हिलगे उपस्थित होते.

सहा महिन्यात ना सनई वाजली, ना बेंडबाजागेल्या सहा महिन्यात ना सनई वाजली, ढोल, हलगी वाजली. ना बेंडबाजा वाजला. या सगळ्याचा परिणाम आमच्या जगण्यावर झाला आहे. म्हणूनच आता सरकारने आमच्या पाठीशी राहण्याची गरज असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी रेणुका देवीची गाणीही सादर करण्यात आली.या होत्या मागण्याकरमणुकीच्या कार्यक्रमांना परवानगी द्यावी, चालू शैक्षणिक वर्षाची फी माफ करावी, सर्व कलावंताना तातडीची आर्थिक मदत द्यावी, कलाकारांना लघुउद्योगास विनाअट अनुदान द्यावे, नाममात्र भाड्याने महापालिकेकडील गाळे द्यावेत, वृध्द कलावंत मानधन योजनेतील श्रेणी रद्द करून सरसकट ५ हजार रूपये मानधन द्यावे, कलाकारांच्या घरांचे वीज, पाणी बील माफ करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :cultureसांस्कृतिकcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर