शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत-जपान’ने संयुक्तपणे संशोधन करावे

By admin | Updated: October 4, 2016 00:54 IST

हिरोशी तेराडा : वारणानगर येथे संसर्गजन्य रोग व औषध संशोधन परिषद

वारणानगर : संसर्गजन्य रोग व औषध संशोधनासाठी जपान व भारतातील शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे संशोधन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जपानचे प्रख्यात शास्त्रज्ञ हिरोशी तेराडा यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत व्यक्त केले.वारणानगर येथील श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेज, आय.सी.टी. मुंबई, पर्ड अहमदाबाद, आय.पी.ए. गोवा, टी.एस.टोकियो व जपान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘आशिया खंडातील संसर्गजन्य रोग व औषध संशोधन’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पणजी (गोवा) येथील मॅकनिज् पॅलेस येथे ही भव्य परिषद पार पडली. या परिषदेस जगभरातील २५0 हून अधिक शास्त्रज्ञ व संशोधक उपस्थित होते.जपानचे शास्त्रज्ञ हिरोशी तेराडा, सलीम वेलजी, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील, अनंत नाईक, डॉ. वंदना पत्रावळे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले.यावेळी परिषदेत मुंबईसह गोवा, अहमदाबाद टोकियो, जपान, नुपाल्स्, निगाता, जपान, आदी देशांच्या संस्थांमधील नामांकित शास्त्रज्ञ व संशोधकांनी संसर्गजन्य रोगांवरील अत्याधुनिक संशोधन पद्धतीवर मार्गदर्शन केले.परिषदेत हिरोशी तेराडा व जी. डी. पाटील यांच्या हस्ते ‘सोवेनिअर’चे प्रकाशन करण्यात आले. कोरे फार्मसीचे प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा यांनी सहसंयोजकांची, प्रा. किरण पाटील यांनी गोषवारा पुस्तकाची व डॉ. मंजाप्पा यांनी वैज्ञानिक समितीची जबाबदारी पार पाडली.परिषदेत घेण्यात आलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत पारीख डी. (निरमा विद्यापीठ, अहमदाबाद), रोहित पवार (आय.सी.टी. मुंबई) व रोनक भूपतानी (मुंबई) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. पर्डचे डायरेक्टर डॉ. मनीष निवसकर यांनी समारोप आढावा घेतला, प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा यांनी आभार, तर प्रा. झकी तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजच्यावतीने पणजी येथे ‘आशिया खंडातील संसर्गजन्य रोग व औषध संशोधन’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन जपानचे प्रख्यात शास्त्रज्ञ हिरोशी तेराडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जी. डी. पाटील, प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा, संशोधक, आदी उपस्थित होते.