शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

पाण्याची चिंता नको; मेअखेर पुरेसा साठा

By admin | Updated: April 30, 2017 01:02 IST

काटकसरीने वापरणे गरजेचे : चित्री, चिकोत्रा खोऱ्यातच टंचाई शक्य

कोल्हापूर : मेच्या अखेरपर्यंत वळीव पाऊस झाला नाही तरी जिल्ह्यातील शेतीला व पिण्यासाठी लागणारा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी बुधवारी दिली. पाणी उपलब्ध असले तरी लोकांनी त्याचा काटकसरीने वापर करावा व यापुढील काळात शेतीसाठी ठिबक सिंचनला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सोमवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई निवारणाची बैठक झाली. त्यामध्ये टंचाईग्रस्त गावांची नावे जाहीर करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर टंचाईची तीव्रता नक्की किती आहे, यासंबंधीची माहिती ‘लोकमत’ने घेतली.कोल्हापूर हा ‘पाणीदार जिल्हा’ असल्याने अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठीही फारशी कधी टंचाई भासत नाही. आता जी ७३ गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत, त्यास प्रशासनाचा गलथानपणा आणि काही ठिकाणी गावांचेही दोष कारणीभूत आहेत. गतवर्षी पर्जन्यमान चांगले झाले आहे. सगळे पाटबंधारे प्रकल्प भरले होते. त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र झाल्या तरी पाण्यासाठी चिंता करण्याचे कारण नाही. शेतीसाठीही पुरेसे पाणी उपलब्ध आहे. साधारणत: मे अखेरपर्यंत पाऊस झाला नाही तरी काळजी करण्याचे काम नाही; परंतु मान्सून लांबलाच तर मात्र अडचणी येऊ शकतात. आपल्याकडे साधारणत: मे मध्ये एक-दोन चांगले वळीव होतात तसे झालेच तर पिकांची एका पाण्याची तहान भागू शकते. जिल्हा परिषद प्रतिवर्षी टंचाईचा आराखडा तयार करते, परंतु तो अंमलात कमी व कागदावरच जास्त राहतो. हा आराखडा जिल्हा प्रशासनाला सादर होऊन मंजुरीची प्रक्रिया होईपर्यंत एखादा पाऊस होतो व टंचाईची तीव्रता कमी झाली की, त्या आराखड्याचे पुढे काय झाले हे पुढील वर्षाचा मे उजाडेपर्यंत कोण पाहत नाही. (प्रतिनिधी)१चित्री, चिकोत्राचे नियोजनचित्री प्रकल्पामध्ये ००.४०० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. एका उन्हाळी आवर्तनासाठी ००.२५० दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे. उर्वरित साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे मध्यम पाटबंधारे प्रकल्प विभागातून सांगण्यात आले. हिरण्यकेशी नदीवर २८ एप्रिल ते १७ मेपर्यंत व २५ मेपासून अंशत: उपसा बंदी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील ३१ व आजरा तालुक्यांतील २३ गावांचा समावेश होतो.२ चिकोत्रा प्रकल्पामध्ये ००.२५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठी उपलब्ध आहे. उन्हाळी आवर्तनासाठी ००.१०० दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता असून उर्वरित पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पावर २९ एप्रिल ते १४ मे व २६ मे ते १० जूनपर्यंत उपसाबंदी प्रस्तावित करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये कागल तालुक्यातील १९, आजऱ्यातील ३ व भुदरगडमधील ५ गावांचा समावेश आहे.पाणी वापरते कोण..?ग्राहकलोकसंख्यावार्षिक वापरउर्वरितसाठी आवश्यकमहापालिका५ लाख ४९ हजार१.७७६००.४०४नगरपालिका३ लाख ११ हजार०.०३४००.००८नगरपरिषद१ लाख १ हजार०.७६००.०१७ग्रामपंचायती२५ लाख ६५ हजार१.५१८००.३४५इतर घरगुती९०००.००६००.००१एमआयडीसी१० हजार ५०००.३६९०.०८४साखर कारखाने१५ हजार०.४०५०.०९२इतर उद्योग३ हजार०.१८३०.०४२एकूण४.३६८०.९९३वीज जोडण्या‘महावितरण’कडे ३० मार्च २०१६ अखेर ८१७९ व गतवर्षात ५६७२ असे १३८५१ वीज जोडणी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६७५२ पंपांना वीज जोडणी दिली असून ७०९९ वीज जोडण्या प्रलंबित आहेत. मार्च २०१८ अखेर १० हजार ९९ जोडण्या देण्यात येणार आहेत.