शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीवर बहिष्कार टाकू नका

By admin | Updated: December 10, 2015 01:32 IST

उच्च न्यायालयाचे आदेश : हमीपत्र सादर; म्हणणे मांडण्यासाठी २९ जानेवारी अंतिम मुदत

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात मंजूर होईपर्यंत येथून पुढे न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालणार नाही, असे हमीपत्र बुधवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांना जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केले. यावेळी न्या. ओक यांनी ‘१२ डिसेंबरच्या लोकअदालतीवर बहिष्कार घालणार आहात काय?’ अशी विचारणा केली. त्यावर पदाधिकाऱ्यांनी खंडपीठ कृती समितीच्यावतीने सहा जिल्ह्णांत २०१२ पासून बहिष्कार टाकत आलो आहे. त्यामुळे याही लोकअदालतीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयाशी आम्ही ठाम असल्याचे सांगितले. यावर न्या. ओक यांनी बहिष्काराचा निर्णय मागे घ्या, असे आदेश दिले. त्यावर पदाधिकाऱ्यांनी आम्ही यावर तत्काळ निर्णय देऊ शकत नसल्याचे सांगितले, अशी माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गेली ३० वर्षे सहा जिल्ह्णांतील वकील संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी लढत आहेत. तत्कालीन न्यायमूर्ती मोहित शहा यांनी या बाबतीत निर्णय न घेता निवृत्ती घेतल्याने संतप्त वकिलांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारात त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी खंडपीठ कृती समितीला नोटीस बजावली होती तसेच मुंबई उच्च न्यायालयात हजर राहून याबाबत म्हणणे जोपर्यंत मांडत नाही, तोपर्यंत न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालणार नाही, अशा हमीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार २ डिसेंबरला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांची बैठक झाली. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार सर्किट बेंचप्रश्नी आंदोलनाबाबत म्हणणे व न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालणार नाही, अशा हमीचे प्रतिज्ञापत्र न्यायालयास सादर करावे, या निर्णयावर सर्वांनुमते मंजुरी घेण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष चव्हाण व पदाधिकारी रवींद्र जानकर, सुनील रणदिवे, मिलिंद जोशी, सुस्मित कामत, रवींद्र नाईक, विजय चाटे, विवेक जाधव, बाबासाहेब वागरे, सचिन मेंडके, माणिक शिंदे, धनश्री चव्हाण, सुशीला कदम आदींनी उच्च न्यायालयात हजर राहून हमीपत्र सादर केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली. त्यावर न्या. ओक यांनी २९ जानेवारी २०१६ अंतिम मुदत देत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात मंजूर होईपर्यंत येथून पुढे न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालणार नाही, असे हमीपत्र उच्च न्यायालयास सादर केले आहे. न्यायमूर्ती अभय ओक यांनी १२ डिसेंबरच्या लोक अदालतीवर बहिष्कार घालू नये, असे आदेश दिले आहेत परंतु सहा जिल्ह्यांमध्ये खंडपीठ कृती समितीच्यावतीने लोक अदालतीवर बहिष्कार घालण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत.- अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण निमंत्रक, खंडपीठ कृती समिती