कोल्हापूर : ‘डरेंगे नहीं, लढेंगे’चा नारा देत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या २२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप सोमवारी झाला. पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचे सावट असलेल्या या अधिवेशनात पानसरेंच्या खुनाचा त्वरित तपास करून मारेकऱ्यांना कडक शिक्षा करावी, यासह अन्य सहा ठराव करण्यात आले. खुन्यांच्या तपासास दिरंगाई केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. अधिवेशनादरम्यान भाकपच्या राज्य सरचिटणीसपदी डॉ. भालचंद्र कांगो यांची फेरनिवड केली. तसेच राज्य कौन्सिलसाठी ७५ प्रतिनिधींचीही निवड केली. पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक, त्यांनी नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाला जाहीर सभांमधून केलेला विरोध आणि ‘हू किल्ड करकरे?’ या विषयावर निवृत्त सनदी पोलीस अधिकारी शमशुद्दिन मुश्रीफ यांच्या व्याख्यानाचे आयोजन या पार्श्वभूमीवर पानसरेंच्या हत्येचा तपास व्हावा, अशी मागणीही करण्यात आली. पानसरेंच्या हत्येचा निषेध करण्यासाठी, तसेच खुन्यांचा तपास जलदगतीने करावा, यासाठी २ मार्चला महाराष्ट्रात निदर्शने करणे, ११ मार्चला मुंबईत विविध १९ पुरोगामी संघटनांनी स्थापन केलेल्या सामाजिक अत्याचार प्रतिबंध समितीच्यावतीने मुंबईत महामोर्चा काढणे, तसेच डाव्या पक्षांनी ठरविलेला ‘संकल्प दिन’ यशस्वी करणे, आदी निर्णय या अधिवेशनात घेण्यात आले. यावेळी अधिवेशनातील सहभागी प्रतिनिधींना पानसरेंचे रक्षा कलशही देण्यात आले. (प्रतिनिधी) अधिवेशनातील ठराव गोविंद पानसरे यांच्या खुनाचा तपास करून मारेकऱ्यांवर कडक कारवाई करावी.कोल्हापूरच्या टोलविरोधी लढाईला समर्थन ‘भूसंपादन कायदा-२०१३’ची अंमलबजावणी करावी. सरकारकडून कामगार कायद्यात होत असलेल्या बदलास विरोध. २६ फे बु्रवारीला कामगार संघटनांचा देशभरातील सत्याग्रहात सहभाग १९६० चा सहकार कायदा पूर्णपणे बदलून नवा कायदा करावाव्यापक आणि मजबूत अन्नसुरक्षा कायदा करावा. या कायद्यात एपीएल व बीपीएल भेद नसावा.४दलित-आदिवासींवरील अत्याचार रोखणे.
डरेंगे नहीं, लढेंगे!
By admin | Updated: February 23, 2015 23:55 IST