शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगाचा जिल्हा परिषदेच्या टेरेसवरून उडी मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 17:43 IST

दिव्यांगांनी पोलीस आणि प्रशासनाची नजर चुकवून थेट जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने शुक्रवारी मुख्यालयात एकच खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली.

ठळक मुद्देदिव्यांगाचा जिल्हा परिषदेच्या टेरेसवरून उडी मारण्याचा प्रयत्नअचानक घडलेल्या प्रकाराने पोलीस यंत्रणेची तारांबळ

कोल्हापूर : दिव्यांगांनी पोलीस आणि प्रशासनाची नजर चुकवून थेट जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने शुक्रवारी मुख्यालयात एकच खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली.

पोलिसांनी क्षणार्धात लिफ्टमधून टेरेसवर धाव घेत आंदोलनकर्त्या पाच दिव्यांगांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. यानंतर तातडीने प्रभारी सीईओ अजयकुमार माने यांनी बैठक घेऊन मागण्या समजून घेत अडवणूक करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईचे आदेश काढले.प्रहार अपंग क्रांती संघटनेने शुक्रवारी जिल्हा परिषदेवर मोर्चाचे नियोजन केले होते. मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा निषेध म्हणून आत्मदहनाचा इशारा दिला असल्याने जिल्हा परिषदेत फायर ब्रिगेडच्या गाडीसह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तीनही गेटना कुलूप लावण्यात आली होती. देवदत्त माने यांच्या नेतृत्वाखाली दुपारी साडेबाराच्या सुमारास दिव्यांगांची मोटारसायकल रॅली दसरा चौक, जिल्हाधिकारी कार्यालय करत मुख्यालयासमोर आली. तेथे जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच आणि मोठा पोलीस बंदोबस्त असतानाच अक्षय म्हेत्तर, गोरखनाथ कांबळे, कृष्णात कवडे, अभिषेक पाटील, बाबासाहेब जाधव हे नजर चुकवून मुख्यालयात घुसले.

तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून निषेधाच्या घोषणा ऐकू येऊ लागल्यानंतर सर्वांचे लक्ष तिकडे गेले. पोलिसांनी वेळीच धाव घेत पाचही दिव्यांगांना ताब्यात घेतले.या घटनेनंतर प्रभारी सीईओ अजयकुमार माने यांनी तातडीने कार्यालयात आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला बोलावले. समाजकल्याण मंत्री दीपक घाटे, ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनाही बैठकीला बोलावले.

 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर