शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग नीलम-अनिल लग्नगाठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 10:34 IST

Divyang Marrige Kolhapur- शिंगणापूर (ता. करवीर) येथील क्रांती हॅन्डीकॅप्ड हेल्प मल्टिपर्पज फौंडेशनच्या वसतिगृहातील दिव्यांग नीलम सुतारचा विवाह करंजिवणे (ता. कागल) येथील अनिल सुतार यांच्याशी मोठ्या थाटामाटात झाला.

ठळक मुद्देदिव्यांग नीलम-अनिल लग्नगाठीत क्रांती हॅन्डीकॅप्ड हेल्प मल्टिपर्पज फौंडेशनचा पुढाकार

कोल्हापूर : शिंगणापूर (ता. करवीर) येथील क्रांती हॅन्डीकॅप्ड हेल्प मल्टिपर्पज फौंडेशनच्या वसतिगृहातील दिव्यांग नीलम सुतारचा विवाह करंजिवणे (ता. कागल) येथील अनिल सुतार यांच्याशी मोठ्या थाटामाटात झाला.नीलम ही गेल्या काही वर्षांपासून संस्थेच्या वसतिगृहात राहत होती. तिचा विवाह करंजिवणे (ता. कागल) येथील सुतार यांच्याशी ठरला. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने माहेरचा भार संस्थेने उचलला. सोन्याचे मणी मंगळसूत्र ते संसार साहित्य, कपडे, भोजनापर्यंतची व्यवस्था संस्थेच्या अध्यक्षा मंजूषा आडके व संजय आडकेंसह अन्य पदाधिकाऱ्यांनी उचलली. त्यामुळे दिव्यांग असणारे दोन जीव लग्नगाठीत अडकले.

विशेष म्हणजे आतापर्यंत एक डझनभर दिव्यांगांसह गरीब मुलींचे विवाह संस्थेच्यावतीने करण्यात आले आहेत. दिव्यांग व गरीब विद्यार्थिनींना मोफत राहण्याची संस्थेच्यावतीने सोय करण्यात आली आहे. विवाह सोहळ्यास नातेवाईकांसह ऋतुजा रेळेकर, संजीव घोलप, बाळासाहेब लवटे, सुशील रेळेकर, स्मिता घोलप, गजानन सुभेदार, आशिष खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Divyangदिव्यांगmarriageलग्नkolhapurकोल्हापूर