शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले

By admin | Updated: May 10, 2015 00:48 IST

गारपीट : सर्वत्र वळवाच्या सरी; जानराववाडीत वीज पडून शेतकरी ठार

सांगली : सांगली-मिरज शहरांसह संपूर्ण जिल्ह्याला शनिवारी वादळी पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. मिरज तालुक्यातील जानराववाडीत वीज पडून एक ठार झाला. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले. दिवसभर उकाडा वाढला असताना सायंकाळी वळीव पाऊस झाल्याने गारवा निर्माण झाला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. जिल्हाभरात दुपारनंतर प्रचंड प्रमाणात उकाडा वाढला होता. सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. मिरज : मिरज व परिसरात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. जानराववाडीत शेतात काम करणाऱ्या विलास सीताराम नाईक (वय ५०) यांच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले. खटावमध्ये पल्लाप्पा शिंगाडे यांच्या गोठ्यावर वीज पडून गाय आणि चार शेळ्यांचा मृत्यू झाला. गावातील परसू पाटील यांच्या घरातील पत्र्याचे छप्पर वादळी वाऱ्याने उडून गेले. वादळी वाऱ्याने तालुक्यातील अनेक गावांत घरांचे, छपरांचे नुकसान झाले. मिरजेत पावसाने रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. जोरदार वाऱ्यामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. इस्लामपूर : इस्लामपूर शहर व परिसरात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. पाच वाजता दहा मिनिटांसाठी व त्यानंतर सातच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस छोट्या गारांसह पडला. वाऱ्याचा जोर असल्याने पावसाची गती मध्यम राहिली. सुरुवातीला छोट्या आकाराच्या गारा पडल्या. सायंकाळी वाऱ्यासह सुरू झालेला पाऊस अर्धा-पाऊण तास एकसारखा पडत होता. कासेगाव, वाटेगाव परिसरात तासभर सरी कोसळल्या. आष्टा व परिसरात सायंकाळनंतर वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. मागील चार दिवसांपासून दिवसभर उन्हाचा जोरदार तडाखा व सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. पावसाळी वातावरणासह विजेचा खेळखंडोबाही चालू आहे. जत : शहर आणि परिसरात सायंकाळी पाचच्या दरम्यान वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पंधरा मिनिटे पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, डाळिंब, द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर उन्हाळी कापूस, भुईमूग ऊस या पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त आहे. मागील चार-पाच दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती, तर दोन-तीन दिवसांपासून सायंकाळी हवेत ढग जमा होत होते; परंतु पाऊस पडत नव्हता. शनिवारी सायंकाळी पाऊस झाल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले असले तरी, खरीप हंगाम पूर्वतयारीसाठी शेतीची मशागत करता येणार आहे. तालुक्याच्या दक्षिण-उत्तर भागात हा पाऊस झाला असून पूर्व -पश्चिम भागात पाऊस झाला नाही. तासगाव : तासगाव शहरासह परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यास सुरुवात झाली. त्यानंतर विजेच्या कडकडाटासह पावसास सुरुवात झाली. शहरासह येळावी, कवठेएकंद, कुमठे, मणेराजुरी, बोरगाव, विसापूर, हातनूर परिसरात जोरदार पाऊस झाला. सावळज परिसरात वादळी वाऱ्याचा जोर होता. मात्र, तुरळक प्रमाणात पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे रस्त्यावर मोडून पडली. त्यामुळे काही वेळासाठी जनजीवन विस्कळीत झाले. विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्यात सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट होऊन पाऊस पडला. पारे, बामणी, चिंचणी, कुर्ली, कार्वे, बलवडी (खा.) परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. आळसंद, वाझर, कमळापूर, भाळवणी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. लेंगरे, माहुली व विटा परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. वादळी वारे असल्याने आंबा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. पलूस : पलूस तालुक्यातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीट झाली. वादळी वाऱ्याने पलूस-तासगाव रस्त्यावर झाले पडली. शिराळा तालुक्यात पुनवत परिसरात गडगडाटासह पाऊस कडेगाव तालुक्यातील कडेपूर, वांगी, देवराष्ट्रे, चिंचणी, नेवरी, आसद येथे गारा पडल्या. आसदमध्ये झाडे पडली, विजेचे खांब वाकले, तारा तुटल्या. तालुक्यातील बहुसंख्य गावांतील वीजपुरवठा खंडित झाला.