शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

जिल्ह्यास पावसाने झोडपले

By admin | Updated: July 23, 2014 00:34 IST

शेतकऱ्यांत समाधान : शिराळ्यात मुसळधार; वारणेकाठी सतर्कतेचा इशारा

सांगली : शिराळा, वाळवा, तासगाव, पलूस तालुक्यासह जिल्ह्यास आज (मंगळवारी) मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, जनजीवन मात्र विस्कळीत झाले. शिराळा : शिराळा तालुक्यात मुसळधार पावसामुळे कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेला असून वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चांदोली धरण परिसरात गेल्या २२ तासात १६६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये २०.३३ टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. अंत्री बुद्रुक येथील बबन किसन चौगुले यांच्या दुमजली घराची भिंत कोसळल्याने सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. दि. २१ च्या रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. आज दिवसभरही लहान-मोठ्या सरी पडत होत्या. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच ओढ्या-नाल्यांतून पाणी वाहू लागले. कोकरूड, आरळा, चरण, वारणावती या परिसरात पावसाचा जोर होता. काही भागात दूरध्वनी सेवा तसेच वीजपुरवठा खंडित झाला होता. कोकरूड येथे चोवीस तासात ६६ मि.मी., तर चांदोली धरण परिसरात १०७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून अतिवृष्टी झाली आहे. चांदोली धरणात २०.३३ टी.एम.सी. पाणीसाठा झाला असून धरण ६० टक्के भरले आहे. धरण परिसरात आजअखेर ९९४ मि.मी. पाऊस पडला आहे.वारणा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. जर असाच पाऊस सुरू राहिला, तर उद्यापर्यंत मांगले-काखे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासात शिराळ्यात ३४ मि.मी. (एकूण २९०), शिरसी २९ (१४५), कोकरूड ६६ (३९६), चरण ४० (३९३), मांगले २३ (३०१), सागाव ७ (२७६), चांदोली धरण १०७ मि.मी. (एकूण ९३५) अशी पावसाची नोंद झाली आहे.तासगाव : तासगाव शहरासह तालुक्यात सर्वत्र आज (मंगळवार) सकाळपासून दमदार पाऊस झाला. सोमवारी मध्यरात्रीनंतर पावसाची उघडझाप सुरू होती. आज सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तालुक्यात ओढ्या-नाल्यांवरील सिमेंट, माती नालाबांधात पाणी साठले आहे. काही भागात शिवारात ताली भरल्या.तासगाव शहरात पडलेल्या पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले. बसस्थानक परिसरात पडलेल्या खड्ड्यांमुळे पाणी साचून प्रवाशांची दैना उडाली. ठिकठिकाणी गटारी तुंबल्याचेही चित्र आहे. मांजर्डे, आरवडे, बलगवडे, बस्तवडे, सावळज, वायफळे, जरंडी, डोंगरसोनी, कवठेएकंद, मणेराजुरी, उपळावी, येळावी, निमणी, विसापूर, हातनूर, शिरगाव, बोरगाव, कुमठे, आळते आदी परिसरात दमदार पाऊस बसरला. दिवसभर पडणाऱ्या हलक्या, मध्यम सरी सायंकाळपर्यंत पडतच होत्या. मिरज : मिरज शहरासह पूर्व भागात मंगळवारी सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यावरील खड्डयात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरल्याने पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. मिरज शहरासह पूर्वभागात गत दोन आठवड्यांपासून पावसाने जोर धरला आहे. थोड्या-थोड्या वेळाच्या अंतराने दिवसभर पाऊस सुरू आहे. मंगळवारी मात्र पावसाने आणखी जोर धरला. शहरासह पूर्व भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. ग्रामीण भागात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पूर्व भागासह शहरातील रस्त्यांचीही मोठी दुरवस्था झाली आहे. खड्डयांमध्ये पाणी साचून रहात आहे. पादचारी व दुचाकीस्वारांना पाणी साचलेल्या खड्डयांचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाने नागरिकांची दैना उडविली. सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान बेडग, आरग, लिंगनूर व परिसरात मुसळधार पाऊस पडला. पलूस : सोमवार रात्रीपासून तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. सोमवार रात्रीपासून आणि मंगळवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. घोगाव, कुंडल, पुणदी, नागराळे, दुधोंडी, पलूस, आमणापूर, धनगाव, सावंतपूर, नागठाणे, बांबवडे, मोराळे, आंधळी, वसगडे, अंकलखोप, भिलवडी आदी गावांसह संपूर्ण तालुक्यात पाऊस पडत आहे. मान्सूनच्या पावसाने जून महिन्यात हजेरी न लावल्याने पेरण्या लांबल्या होत्या. आजअखेर पलूस तालुक्यात ७९.८ मि.मी. पाऊस झाला आहे, तर २३९०९ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी आतापर्यंत २२२५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. दोन दिवसात झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही थोडाफार सुटण्यास मदत होणार आहे. कडेगाव : कडेगाव तालुक्यात दिवसभर जोरदार पाऊस झाला. यावर्षीच्या पावसाळ्यात आज पहिल्यांदाच जोरदार पावसाने हजेरी लावली. कडेगाव, कडेपूर, वांगी, चिंचणी, शाळगाव, नेवरीसह तालुक्यात सर्वत्र आज पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे आता खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळणार आहे. इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील सर्व गावांमधून या हंगामातील पावसाने सोमवारी मध्यरात्रीपासून संततधार धरली. त्यानंतर मंगळवारी दिवसभर पावसाच्या मुसळधार सरी कोसळत राहिल्या. आज सकाळी आठपर्यंत कामेरी मंडलात सर्वाधिक २३, तर इस्लामपूरमध्ये १९ मि. मी. पावसाची नोंद झाली. आजअखेर कासेगाव मंडलात सर्वाधिक एकूण १६० मि. मी. पाऊस झाला. मध्यरात्रीपासून सुरू झालेला हा पाऊस एकसारखा कोसळत होता.वाळवा तालुक्यात मंडलनिहाय झालेला पाऊस असा. इस्लामपूर (१२४), ताकारी (६६.५), वाळवा (५०), आष्टा (१४३.५), बहे (५२), तांदूळवाडी (११७), कोरेगाव (१२७), पेठ (७४), कुरळप (६०.८), कासेगाव (१६०) व कामेरी (११८). गेल्यावर्षी २२ जुलैअखेर कामेरीत ३७४ मि. मी.; तर इस्लामपूर मंडलात ३५२.३ मि. मी. पावसाची नोंद झाली होती.(वार्ताहर)