शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

डमी ग्राहक बनून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची साठेबाजांवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:01 IST

कोल्हापूर : युरिया गोडावूनमध्ये असतानाही तो संपला आहे, असे उत्तर चक्क जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनाच ऐकावे लागले. डमी ग्राहक ...

ठळक मुद्दे युरियाची साठेबाजी, वाढीव दराबद्दल खत विक्री संघावर कारवाई

कोल्हापूर : युरिया गोडावूनमध्ये असतानाही तो संपला आहे, असे उत्तर चक्क जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनाच ऐकावे लागले. डमी ग्राहक बनून गेलेल्या अधिकाºयांना वस्तूस्थिती कळाल्यावर लागलीच धाडी टाकण्याची कारवाई करावी लागली. साठेबाजी आणि वाढीव दराने विक्री केल्याचा गुन्हा नोंदवून चार खत खरेदी विक्री संघांना जाग्यावरच कारवाईची नोटीस काढण्यात आली. उद्या मंगळवारी सुनावणी झाल्यानंतर परवाना निलंबनाची कारवाई होणार आहे.

जिल्ह्यात कृषी विभागाने रासायनिक खते उपलब्ध करून दिली आहे, कुठेही टंचाई भासणार नाही, असे नियोजन केले आहे, तथापि लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याचे कारण देत खत विक्री संघ व कृषी सेवा केंद्राकडून शेतक-यांची अडवणूक होत आहे. तक्रारी वाढल्याने स्वत: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी तिघांचे पथक स्थापन करून स्वत:च जिल्हाभर फिरण्यास सुरुवात केली आहे. यात त्यांच्यासोबत मोहीम अधिकारी एस. आर. देशमुख, गुणनियंत्रण कक्ष अधिकारी रामचंद्र शेळके हे देखील सहभागी झाले आहेत.गेल्या तीन दिवसांपासून हे दौरे करीत आहेत. अचानक एखाद्या खतांच्या दुकानात जात आहेत, तेथे ओळख लपवून खतांची मागणी करीत आहेत.

सरवडे व मुदाळतिट्टा येथे युरियाची मागणी केली असता युरिया संपला असल्याचे त्यांना सांगण्यात आले, त्यानंतर त्यांनी १0:२६:२६ हे खत मागितले, त्याची पावती देण्यास सांगितले, पण ते वाढीव दराने दिल्याने त्यांनी रेकॉर्ड तपासले, गोडावूनची पाहणी केली असता, तब्बल १२८ पोती युरियाची सापडली. गोडावून सील करून त्या खरेदी विक्री संघाच्या दुकानदारांवर तिथेच कारवाई केली. रविवारी बिद्री, बोरवडे, सरवडे, उंदरवाडी, मुदाळतिट्टा तर शनिवारी तळसंदे, नवे पारगाव, कोडोली, शहापूर, केर्ली या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. पूर्णपणे ओळख लपवून ही तपासणी होत असल्याने दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. 

दोन दिवसांत १६ दुकाने तपासली, चार दुकानदारांच्या व्यवहारात गडबड आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली आहे. तालुका पथकाकडून आणखी चार प्रस्ताव आले आहेत. या सर्वांची मंगळवारी सुनावणी होऊन त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू होणार आहे.ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर