शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लाखाची लाच स्वीकारताना कोल्हापूरच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यास अटक

By उद्धव गोडसे | Updated: October 3, 2023 18:48 IST

कोल्हापूर : ठेकेदाराने क्रीडा कार्यालयास पुरविलेल्या साहित्याचे आठ लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी १५ टक्के दराने एक लाख १० हजार ...

कोल्हापूर : ठेकेदाराने क्रीडा कार्यालयास पुरविलेल्या साहित्याचे आठ लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी १५ टक्के दराने एक लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारणारा जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर विश्वनाथ साखरे (वय ५२, रा. राजगुरू हाउसिंग सोसायटी, विश्रामबाग, सांगली) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. मंगळवारी (दि. ३) दुपारी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जिल्हा क्रीडा कार्यालयातच ही कारवाई झाली. या कारवाईमुळे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा लाचखोर कारभार चव्हाट्यावर आला. साखरे यांची क्रीडा उपसंचालक म्हणून पदोन्नती होणार होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील ठेकेदाराने कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयास ॲल्युमिनियम प्रिंटिंग प्लेट पुरवण्याचे ई-टेंडर घेतले होते. दोन महिन्यांपूर्वी काम पूर्ण करून त्यांनी आठ लाख ८९ हजार २०० रुपयांची बिले सादर केली. मात्र, जिल्हा क्रीडा अधिकारी साखरे यांनी बिल मंजूर करण्यास टाळाटाळ केली. चार दिवसांपूर्वी ठेकेदाराने भेटून विचारणा केली असता, त्यांनी बिल मंजूर करण्यासाठी एकूण बिलाच्या १५ टक्के म्हणजे एक लाख २७ हजार ९५० रुपये लाचेची मागणी केली. याबाबत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.तक्रारीची खातरजमा केल्यानंतर मंगळवारी जिल्हा क्रीडा कार्यालयात सापळा रचून, साखरे याला एक लाख १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. साखरे याच्या सांगलीतील घराची झडती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. उपअधीक्षक नाळे यांच्यासह निरीक्षक बापू साळुंके, संजीव बंबरगेकर, सुनील घोसाळकर, सचिन पाटील, मयूर देसाई, संदीप पवार आदींनी ही कारवाई केली.

साखरेची वादग्रस्त कारकिर्दलाचखोर साखरे २०१८ पासून कोल्हापुरात आहे. ते उत्तम योग शिक्षक आहेत. योग व क्रीडा शिक्षणात त्यांनी पीएच.डी. केली आहे. कार्यालयातही त्यांचा दबदबा होता. त्याच्या कार्यशैलीवर अनेक खेळाडू आणि क्रीडा संघटना नाराज होत्या, अशी चर्चा आहे.

जळगावची बदली रोखलीकार्यकाल पूर्ण झाल्यानंतर चार महिन्यांपूर्वीच साखरे याची जळगावला बदली झाली. मात्र, त्याने एका ‘अमित’ला काही लाख रुपये देऊन बदली टाळल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात आहे. लाच घेताना त्याला अटक झाल्याचे समजताच काही क्रीडा संघटनांनी आनंदोत्सव साजरा केला.

चंदगडला तीन टक्के, कोल्हापुरात १५ टक्केचंदगडला जल जीवन मिशनच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी उपअभियंता महिलेने तीन टक्के दराने ३३ हजारांची मागणी केली होती. साखरे यांनी चक्क १५ टक्के दराने लाचेची मागणी केली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी दोन महिन्यांपूर्वी लाचेचे असेच दरपत्रक जाहीर केले होते व त्याबद्दल सरकारकडे बोट दाखविले होते.

आठ महिन्यांत १७ कारवायाउपअधीक्षक नाळे यांनी जानेवारी २०२३ पासून १७ कारवाया केल्या. यात वर्ग १ च्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली. तक्रारदारांनी आवश्यक पुराव्यांसह लाचखोरांच्या विरोधात तक्रारी द्याव्यात, असे आवाहन नाळे यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग