शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘झूम’च्या दुर्गंधीवरून अधिकारी फैलावर प्रदूषण नियंत्रण मंडळाची बैठक-नागरिक संतप्त; प्रत्यक्ष जागेवर जाऊन तीन तास पाहणी; पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 01:14 IST

कसबा बावडा परिसरातील जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी), झूम घनकचरा प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. शासकीय विश्रामगृह, भोसलेवाडी, कदमवाडी, लाईन बझार परिसरात पसरणाऱ्या

कोल्हापूर : कसबा बावडा परिसरातील जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी), झूम घनकचरा प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. शासकीय विश्रामगृह, भोसलेवाडी, कदमवाडी, लाईन बझार परिसरात पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्यात बैठकीवेळी शाब्दिक वादावादी झाली. त्यानंतर अधिकाºयांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन सुमारे तीन तास पाहणी करून पंचनामे केले. त्यानंतर महापालिकेवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली.

शासकीय विश्रामगृह, भोसलेवाडी, कदमवाडी, लाईन बझार या परिसरात काही दिवस दुर्गंधी व प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्याबद्दल संतप्त नागरिकांनी ई वॉर्ड अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या. त्यानंतर मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात अधिकाºयांसोबत नागरिकांची बैठक झाली. प्रादेशिक अधिकारी नागेश लोहळकर व क्षेत्र अधिकारी अविनाश कडलगे यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अधिकाºयांनी प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देऊन सुमारे तीन तास पाहणी करून पंचनामे केले.

आंदोलनात सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण, डॉ. लीपी मोहंती, सुमन पाटील, बी. एल. बर्गे, मनिंदर गुप्ता, स्नेहल कांबळे, राहुल कदम, लक्ष्मण माने, शिवाजी चोपडे केविन फर्नांडिस, नंदलाल कुमावत, गौरव कुसाळे, मुकुंद कदम, अतुल कवाळे, इरशाद फरास, दिनेश होनकळस, दिलजित चोपडे, प्रफुल्ल रोकडे, आदी उपस्थित होते.कारवाईचा आग्रहअधिकाºयांनी, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार पाठवतो असे उत्तर दिले. त्यावर समाधान न झाल्याने नागरिक संतप्त झाले. त्यांनी पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार महापालिकेवर कारवाईचा आग्रह धरला. त्यावेळी कांबळे यांच्यासह नागरिकांची अधिकाºयांशी शाब्दिक वादावादी झाली.शासकीय विश्रामगृह, भोसलेवाडी, कदमवाडी, लाईन बझार परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य.घनकचरा, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पामुळे होणाºया प्रदूषणाबाबत कोल्हापुरातील लाईन बझार, कदमवाडी परिसरातील संतप्त नागरिकांनी मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात बैठकीवेळी अधिकाºयांना धारेवर धरले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण