शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

न्याय मागणं झालं सुलभ, मिळतो मोफत वकील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 13:49 IST

पैसे नाहीत म्हणून न्यायासाठी कोणीही वंचित राहू नये यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे सरकारी खर्चाने वकिलाची नेमणूक केली जाते

कोल्हापूर : पैसे नाहीत म्हणून न्यायासाठी कोणीही वंचित राहू नये यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे सरकारी खर्चाने वकिलाची नेमणूक केली जाते. याचा लाभ आतापर्यंत अनेकांना झाला आहे. यामुळे आर्थिक कुवत नसलेल्यांनाही न्याय मागणे सुलभ झाले आहे.समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांना न्यायालयात न्याय मागता येत नाही. त्यांची बाजू मांडल्याशिवाय न्यायदानाची प्रक्रियाही पूर्ण होऊ शकत नाही. अशांना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे मोफत वकील दिला जातो. यासाठी येथील न्यायालयातील प्राधिकरणाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.मोफत विधि सहाय्य कोणाला मिळू शकते?जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे अनुसूचित जाती, जमाती, अठरा वर्षांच्या आतील व्यक्ती, दिव्यांग, तीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना मोफत वकील दिला जातो.यासाठी दिला जातो खर्चमोफत दिलेल्या वकिलांना विधि सेवा प्राधिकरणकडून अधिकाधिक साडेसात हजार रुपये एका खटल्यासाठी दिले जातात. यामध्ये अर्ज करताना बाराशे रुपये आणि प्रत्येक तारखेला ५०० ते ७५० रुपये असे मानधन संबंधित वकिलांना दिले जातात. असे वकील देण्यासाठी पॅनल तयार केले आहे. पॅनलमध्ये सामाजिक बांधिलकी असलेल्या चांगल्या वकिलांचा समावेश असतो.

वर्षभरात ३०० जणांना मोफत वकीलवर्षभरात सर्वसाधारणपणे ३०० जणांना मोफत वकील देण्यात आला आहे. दिवसेंदिवस मोफत वकील मागणाऱ्यांची संख्या वाढते आहे. गरजेनुसार पात्र असलेल्यांना वकील दिले जात आहेत. तडजोड करण्यायोग्य खटले असल्यास दोन्ही बाजूच्या पक्षकारांचे समुपदेशन करूनही खटले मिटवले जातात.

अनुसूचित जाती, जमातीसह तीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांनी मागणी केली तर मोफत वकील दिला जातो. यासाठी प्राधिकरणाकडे मागणी अर्ज करावा लागतो. - राजीव माने, प्रभारी अधीक्षक, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयadvocateवकिल