शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बारा वर्षे संघर्ष : जिल्हा बॅँकेच्या ६५ अनुकंपा मुलांना अखेर न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 09:43 IST

जिल्हा बॅँकेच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत संधी दिली जाते. मात्र २००७ पासून अनुकंपाची भरती प्रक्रिया थांबली होती. त्यात ‘एनपीए’ वाढल्याने बॅँकेवर नोव्हेंबर २००९ मध्ये प्रशासक मंडळ आले. बॅँकेची गाडी रुळांवर येण्यास २०१४ उजाडले.

ठळक मुद्देयुनियन - बॅँक प्रशासन समझोता : लिपिकांना आठ हजार, तर शिपायांना सहा हजार पगार

राजाराम लोंढे, 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ६५ अनुकंपाखालील मुलांना तब्बल १२ वर्षांनंतर न्याय मिळाला. एकूण ७९ कर्मचारी मृत झाले असले तरी त्यांतील ६५ जणच पात्र ठरले आहेत. बॅँक प्रशासन व कर्मचारी युनियनमध्ये समझोता झाला असून, लिपिकांना आठ हजार, तर शिपायांना सहा हजार रुपये पगार देण्यावर एकमत झाले असून, त्यांना उद्या, शनिवारपासून कामावर घेण्याचे प्रयत्न आहेत.

जिल्हा बॅँकेच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत संधी दिली जाते. मात्र २००७ पासून अनुकंपाची भरती प्रक्रिया थांबली होती. त्यात ‘एनपीए’ वाढल्याने बॅँकेवर नोव्हेंबर २००९ मध्ये प्रशासक मंडळ आले. बॅँकेची गाडी रुळांवर येण्यास २०१४ उजाडले. संचालक मंडळ २०१५ साली जरी कार्यरत झाले असले तरी संचित तोटा कमी झाल्याशिवाय कोणताच निर्णय घेता येत नव्हता. प्रशासक व त्यानंतर संचालक मंडळाच्या काळात कर्मचारी युनियनने या वारसांना कामावर घ्यावे, यासाठी निकराचे प्रयत्न केले. घरातील कर्ती व्यक्ती अचानक गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले होते. त्या वेदनेतून संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनी बॅँकेच्या दारात साखळी उपोषण सुरू केले. मात्र बॅँकेची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत बॅँकेलाही काही करता येत नव्हते. या कर्मचाºयांबरोबरच २००७ पासून रोजंदारीवर काम करणाºया १०० वारसांचा प्रश्नही गंभीर होता. मध्यंतरी या १०० कर्मचाºयांना कायम केल्यानंतर अनुकंपाच्या वारसांनाही सेवेत घेऊ, असे आश्वासन बॅँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी युनियनला दिले होते.

त्यानुसार सोमवारी (दि. २७) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अनुकंपाचा विषय आयत्या वेळच्या विषयात घेतला होता. त्यावर युनियनसोबत चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ संचालक पी. जी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली होती. या समितीबरोबर युनियन प्रतिनिधींची चर्चा होऊन या वारसांना कामावर घेण्यात येणार असून, जे पदवीधर आहेत, त्यांना लिपिक म्हणून, तर जे पदवीधर नाहीत, त्यांची शिपाई म्हणून नेमणूक केली जाईल. तब्बल १२ वर्षे या कर्मचाºयांनी संघर्ष केल्यानंतर अखेर न्याय मिळाल्याने इतर कर्मचाºयांमधून समाधान व्यक्त होत आहे.

तिस-या वर्षी प्रोबेशनल आॅर्डरया कर्मचाºयांना दोन वर्षे आठ व सहा हजार रुपये पगारावर काम करावे लागणार आहे. बॅँकेवर आर्थिक ताण येऊ नये, यासाठी तिसºया वर्षी त्यांना प्रोबेशनल आॅर्डर देण्यात येणार आहे. --------------------------------

  • १४ जण अपात्र का ठरले?

-सेवेत असताना आत्महत्या केली.-गैरव्यवहार केला म्हणून बडतर्फ केले आणि मृत्यू झालेल्यांना.-बॅँकेविरोधात न्यायालयात गेलेल्यांना आणि मृत्यू झालेल्यांना.-मृत कर्मचा-यांच्या वारसाचे वय अठरा वर्षे पूर्ण नाही. 

टॅग्स :jobनोकरीbankबँकkolhapurकोल्हापूर