शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

वादग्रस्त माले सोसायटीतील लॅपटॉप गायब

By admin | Updated: January 30, 2015 00:52 IST

सचिवांची तक्रार : चौकशीस काहींचा मुद्दाम विरोध : ‘लोकमत’चा पाठपुरावा

कोल्हापूर : माले-माळवाडी (ता. पन्हाळा) येथील भैरवनाथ सेवा सोसायटीतील सर्व व्यवहारांची इत्थंभूत माहिती असणारा संस्थेच्याच मालकीचा लॅपटॉप गायब झाला असल्याची तक्रार त्यास संस्थेचा सचिव गुलाब घनश्याम सोळसे याने केली आहे. सोळसे यांने गैरव्यवहार केल्याची संचालक मंडळाची तक्रार आहे परंतु ज्यांनी गैरव्यवहार केला त्यांचे बिंग फुटू नये अशांनीच हा लॅपटॉप गायब केल्याचा संशय सोळसे याने व्यक्त केला आहे.‘लोकमत’मध्ये गेल्या आठवड्यात या सोसायटीतील गैरव्यवहाराचा पर्दाफाश करणारी वृत्तमालिका प्रसिद्ध झाली. त्याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने बँक निरीक्षक भरत घाटगे यास तडकाफडकी निलंबित केले. जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी संस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी उपलेखापाल सागर बलकवडे यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी दोनवेळा संस्थेस भेट दिली व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत परंतु बँकेने सचिव चौकशीस सहकार्य करत नसल्याने त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे जाहीर केले होते. त्यासंबंधी सचिव सोळसे यांनी निवेदनाद्वारे आपली बाजू मांडली आहे.निवेदनात म्हटले आहे,‘सोसायटीतील गैरव्यवहारास वाचा फोडल्याबद्दल मी ‘लोकमत’चा आभारी आहे. कारण त्यामुळे आता संस्थेच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी व लेखापरीक्षण होऊन नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होण्यास मदत होईल. बँकेचे व सहकार विभागाचे कोणतेही अधिकारी चौकशीसाठी आले असता मी कुठेही गायब झालेलो नाही. माझे घर संस्थेपासून ३५ पावलांवर आहे. लेखापरीक्षकांनी भेट दिली तेव्हा मी घरीच होतो. मध्यंतरी माझा अपघात झाल्यावर संस्थेच्या संचालक मंडळाने कार्यालयाचे कुलूप काढून नवीन कुलूप घातले. त्यामुळे लेखापरीक्षकांना दोन्ही वेळ चावी आणेपर्यंत तासभर ताटकळत थांबावे लागले.कोंबडं झाकलं म्हणून...लेखापरीक्षकांनी दप्तर काढून घेतले असता ज्या मुख्य मुद्द्यावर संस्थेत गैरव्यवहाराचा संशय आहे त्यासंबंधीची १) एक एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ अखेरची संस्थेची किर्द, डे-बुक, २) गायी-म्हशी कर्जप्रकरण व कर्जरोखे फाईल ३) संस्थेचे २०१३-१४ चे(२०११-१२ व २०१२-१३ समाविष्ट) कमाल मर्यादा पत्रक ४) संस्थेचे जिंदगी पत्रक ५) सन २०१२-१३, २०१३-१४ व १ एप्रिल २०१४ पासून पुढील आॅगस्टपर्यंतचा संस्थेचे सर्व दप्तर, जमा-खर्च संगणकीकृत असणारा संस्था मालकीचा ‘लॅपटॉप’ या बाबी संस्थेतून गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ज्या अफरातफरीचा गाजावाजा होत आहे, त्याची तज्ज्ञांकडून चौकशीच होऊ नये असे कोणास वाटते याचाही शोध घेतला जाण्याची आवश्यकता आहे. मी ज्या गोष्टींसाठी जबाबदार असेल त्याची शिक्षा भोगायला तयार आहे. कुणी कोंबडं झाकले म्हणून सूर्योदय व्हायचा राहणार नाही, याची मला खात्री आहे.दप्तर ताब्यात..उपलेखापरीक्षक सागर बलकवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशीची आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेऊन कपाट सील केल्याचे सांगितले. निवडणुकीची घाई सुरू असल्याने चौकशी अद्याप सुरू केली नसल्याचे त्यांनी सांगितले.