शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...अन् शिवसैनिक मुरलीधर जाधव ढसाढसा रडले; उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 16:22 IST

बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. मी आजही उद्धव ठाकरेंना दैवत मानतो. माझ्याबद्दल उद्धव ठाकरेंचे कान भरलेले आहेत असा आरोप त्यांनी केला. 

कोल्हापूर - हातकंणगले मतदारसंघावरून शिवसेना उबाठा गटात वादळ उठलं आहे. राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भैटीवर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी आक्षेप घेतला. त्यावरून जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या हकालपट्टीनंतर मुरलीधर जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. इतकी वर्ष पक्षासाठी झटून माझ्यावर अन्याय झाला अशी भावना त्यांनी व्यक्त केली त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. 

मुरलीधर जाधव म्हणाले की, मी जे विधान केले त्यावर कुठेही मातोश्रीवर कुणी भेटावे कुणी नाही हे बोललो नाही. पक्षासाठी झीज करणारा १९ वर्ष जिल्हाप्रमुख आहे. ५ वर्ष शहरप्रमुख म्हणून काम केले. अंगावर प्रसंगी चाकूचे वार झेलले. पोलिसांचा मार खाल्ला आहे. मग मी पक्षासाठी का उभा राहू नये असं मला का वाटू नये? आपल्यासोबत कोण राहिलं याचा विचार करायला हवा होता. राजू शेट्टी यांना विरोध एवढ्यासाठीच की २०१४ ला महायुतीच्या माध्यमातून राजू शेट्टी यांना निवडून दिले. त्यानंतर विधानसभेत राजू शेट्टी भाजपासोबत गेले तेव्हा माझ्यासारख्या शिवसैनिकांना किती वेदना झाल्या असतील. बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. मी आजही उद्धव ठाकरेंना दैवत मानतो. माझ्याबद्दल उद्धव ठाकरेंचे कान भरलेले आहेत असा आरोप त्यांनी केला. 

तसेच सुचित मिणचेकर गेल्या ४ महिन्यापासून मुरलीधर जाधवांना पदमुक्त करा असा प्रयत्न सुरू आहे. सुजित मिणचेकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्येक गावांत चाचपणी सुरू होती. शिंदे गटात गेलो तर कसे होईल. मुरलीधर जाधवांना पदावरून कमी करणार असाल तर मी पक्षात थांबतो अशी भूमिका मिणचेकरांनी घेतली. परवाचे निमित्त फार मोठे नव्हते. १९ वर्ष मी पक्षासाठी काम केले. रस्त्यावर मी आंदोलन करत असताना आमदार गाणी म्हणत होते.  माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकांनी डोक्यात गोळी घालण्याचं बाकी आहे. इतका माझ्यावर अन्याय झाला असं मुरलीधर जाधव यांनी सांगितले. 

दरम्यान, मातोश्रीवर साहेबांना भेटायला गेलो तर साहेबांच्या बाजूची चार पाच माणसं भेटतात. त्यांना काम सांगायचे. मग भावना कुणासमोर मांडायच्या. शिंदेंच्या बंडानंतर पक्ष अडचणीत होतो. तेव्हा आमदाराने एकही प्रतिज्ञापत्र दिलं नाही. पूर्ण ताकदीनिशी मी साहेबांच्या मागे उभे राहिलो. सर्वाधिक प्रतिज्ञापत्र दिली. मला बोलवून सांगायला हवं होतं. मुरली तुझं चुकलं. १९ वर्ष जिल्हाप्रमुख, ३ वर्ष तालुकाप्रमुख, ५ वर्ष शहरप्रमुख इतकं असून अर्धा मिनिटांच्या भावनेत तुम्ही माझी हकालपट्टी केली. मी पक्षाबद्दल आणि उद्धव ठाकरेंबाबत एकही वाक्य चुकीचे बोललो नाही. मला शिवसेना या चार शब्दाने मोठे केले असं मुरलीधर जाधव यांनी म्हटलं.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे