शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण संघटनांतील वाद उफाळला, वेगवेगळ्या दिवशी निवड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:40 IST

राज्याच्या क्रीडा कार्यालयाने एकोणीस खेळांची मान्यता रद्द केल्यानंतर जलतरण संघटनांमधील वाद उफाळला आहे. यात एका संघटनेची निवड चाचणी स्पर्धा १६ मे ला, तर दुसऱ्या संघटनेची स्पर्धा १८ मे ला होणार आहे. त्यामुळे पालक व खेळाडूंमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देजलतरण संघटनांतील वाद उफाळलादोन्ही असोसिएशनची वेगवेगळ्या दिवशी निवड चाचणी

कोल्हापूर : राज्याच्या क्रीडा कार्यालयाने एकोणीस खेळांची मान्यता रद्द केल्यानंतर जलतरण संघटनांमधील वाद उफाळला आहे. यात एका संघटनेची निवड चाचणी स्पर्धा १६ मे ला, तर दुसऱ्या संघटनेची स्पर्धा १८ मे ला होणार आहे. त्यामुळे पालक व खेळाडूंमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी सवलत (ग्रेस) गुणांकरिता अनेक संघटनांच्या जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या. मात्र, त्यातील काही संघटनांची मान्यता राज्य, राष्ट्रीय पातळीवर नसल्याने क्रीडा कार्यालयाने या खेळाडूंचे प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने ते पाठविले नाहीत. याकरिता तीन वेळा प्रस्ताव पाठविण्यासाठी मुदतवाढही दिली.

या सर्व प्रकारामुळे खेळाडूंचे नुकसान झाले. त्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जलतरण खेळ प्रकारात दोन संघटना निर्माण झाल्या आहेत. यात एक पालकांची संघटना असून, त्याला स्विमिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्रने मान्यता दिली आहे, तर २९ वर्षांपूर्वीची कोल्हापूर जलतरण संघटना यांच्यामध्ये आता स्पर्धा घेण्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे नव्या पालकांच्या संघटनेची निवड चाचणी स्पर्धा शनिवारी (दि. १८) आहे. या स्पर्धेतून निवडला जाणारा संघ पुणे येथील बालेवाडीमध्ये ३१ मे व १ आणि २ जून दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय सब-ज्युनिअर व ज्युनिअर जलतरण स्पर्धेसाठी खेळणार आहे, तर जुन्या संघटनेची निवड चाचणी स्पर्धा गुरुवारी (दि. १६ मे) सागर पाटील जलतरण तलाव येथे होणार आहे. यातून निवडला जाणारा संघ नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे. याबाबत अधिकृतरीत्या माहिती सांगण्यास दोन्ही संघटनांच्या सूत्रांनी नकार दिला आहे. 

 

 

टॅग्स :Swimmingपोहणेkolhapurकोल्हापूर