शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

हा आमच्या शाहू महाराजांचा पुतळा नव्हेच!, दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील पुतळा बदलण्याची गरज

By समीर देशपांडे | Updated: July 4, 2024 14:23 IST

सदनामध्ये जाऊन आलेल्या अनेकांनी या पुतळ्याविषयी नाराजी व्यक्त केली

समीर देशपांडेकोल्हापूर : आपल्या क्रांतिकारी निर्णयांनी देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचा दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पुतळा महाराजांच्या धिप्पाड व्यक्तिमत्वाला ठेच पोहोचवणारा आहे. त्यामुळे तो बदलण्याची मागणी होऊ लागली आहे. सदनामध्ये जाऊन आलेल्या अनेकांनी या पुतळ्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या या महाराष्ट्र सदनचे उद्घघाटन ४ जून २०१३ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. सदनाच्या अग्रभागी शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा आहे. परिसरात महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत. आतील मोक्याच्या दर्शनी भागात छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे पूर्णाकृती पुतळे आहेत. परंतु, हाच शाहू महाराजांचा पुतळा पाहून शाहूप्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत. कोल्हापूरचे नूतन खासदार शाहू छत्रपती यांच्यासह अनेक मान्यवर २६ जून राेजी या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिल्लीत एकत्र आले होते. त्याचे फोटो महाराष्ट्रात व्हायरल झाल्यानंतर या पुतळ्याबाबत नाराजीच्या प्रतिक्रियांमध्ये वाढ झाली.पुतळ्यातील दोष

  • शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व हे बलदंड आणि पैलवानी शरीरयष्टीचे होते. ते या पुतळ्यात कुठेही दिसत नाही.
  • या पुतळ्यातील शाहू महाराजांची प्रकृती कृश असल्याचे दिसते.
  • या पुतळ्यातील खांदे पडलेले असून, आजारपणातून उठल्यासारखा हा पुतळा आहे.
  • डोळे खूपच आत गेलेले आहेत.

बघणारा चुकचुकतोचपश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शाहू महाराजांचे पुतळे आहेत. कोल्हापुरातील दसरा चौकातील पुतळा मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांनी उभारला होता. तो पुतळा पाहिलेले अनेकजण जेव्हा महाराष्ट्र सदनातील हा पुतळा पाहतात तेव्हा चुकचुकतात. ‘आमचे शाहू महाराज असे नव्हते’ हीच त्यांची प्रतिक्रिया असते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdelhiदिल्लीShahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंती