शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

दिवसभर हुलकावणी, संध्याकाळी जोरदार तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:50 IST

दिवसभराच्या हुलकावणीनंतर संध्याकाळी पुन्हा एकदा पावसाने जोरदार तडाखा दिला. पावसाचा जोर पाहून मंगळवारी (दि. ८) ढगफुटीसारख्या झालेल्या पावसाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्याने अनेकांच्या काळजात धस्स झाले.

ठळक मुद्देदिवसभर हुलकावणी, संध्याकाळी जोरदार तडाखा ढगफुटीच्या आठवणी ताज्या

कोल्हापूर : दिवसभराच्या हुलकावणीनंतर संध्याकाळी पुन्हा एकदा पावसाने जोरदार तडाखा दिला. पावसाचा जोर पाहून मंगळवारी (दि. ८) ढगफुटीसारख्या झालेल्या पावसाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्याने अनेकांच्या काळजात धस्स झाले.

सव्वासातच्या सुमारास शहरात जोरदार पावसाने आगमन केले. तत्पूर्वी आभाळ भरून आल्याने मोठा पाऊस येईल, या भीतीने अनेकांनी लवकर घर गाठणे पसंत केले.सोमवारी व मंगळवारी सलग दोन दिवस ढगफुटीसदृश पावसाने थरकाप उडविल्यानंतर बुधवारी (दि. ९) आजरा, राधानगरी, भुदरगड वगळता जिल्ह्यात विश्रांती घेतली. गुरुवारी सकाळपासूनच आभाळ भरून आले होते.

दुपारनंतर ते निवळल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता; पण संध्याकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. दरम्यान, रविवार (दि. १३)पासून पुन्हा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने चिंतेत भर पडली आहे. बुधवारी आजऱ्यात ३३, राधानगरीत १७, भुदरगडमध्ये १२ मि.मी. पाऊस झाला आहे.गगनबावडा, शाहूवाडीमध्ये किरकोळ सरी पडल्या आहेत. तत्पूर्वी, मंगळवारी मात्र पन्हाळा, करवीर, कागल या तालुक्यांत ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवून दिला. या पावसाच्या भीतीतून अजूनही लोक सावरलेले नाहीत.

गुरुवारी सकाळी पुन्हा पावसाचे वातावरण झाल्याने अनेकांच्या छातीत धस्स झाले. दिवसभर आभाळ भरून आल्यासारखेच वातावरण होते; पण पाऊस मात्र झाला नाही. संध्याकाळपर्यंत तरी लोक पावसापासून सुटका झाल्याच्या समाधानात राहिले; पण सातनंतर जोरदार तडाखा सुरू झाल्याने पुन्हा एकदा भीती दाटून राहिली.

पुन्हा पावसाचा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारपासूनच पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविला आहे. किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पाऊस पुन्हा जोर धरणार आहे. रविवारपासून कोल्हापुरात पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर