शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

देवस्थान समितीत अपहार झाल्याची चर्चा

By admin | Updated: May 24, 2014 00:59 IST

दुजोरा नाही : सावंत याला पोलीस कोठडी

 कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कर्मचार्‍याने एक लाख ३९ हजार रुपयांचा अपहार केल्याची चर्चा आहे, परंतु त्याबाबत समितीच्या सूत्रांकडून दुजोरा मिळू शकला नाही. अशा प्रकारचा अपहार झाला असून त्याबाबत जुना राजवाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे काहींनी वृत्तपत्रांना कळविले. त्यानुसार पोलिसांकडे चौकशी केली असता अशा प्रकारची तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले. सध्या समितीतील कर्मचारी प्रल्हाद सावंत यांनी दागिन्यांचे मोजमाप करताना त्यातील एक डबी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यास पोलिसांनी अटक केली असून त्यास सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. ही घटना २२ एप्रिलला घडूनही त्यासंबंधीचा गुन्हा दाखल होण्यास तब्बल महिन्याचा कालावधी गेला. त्यामुळे अपहाराबद्दलही तसेच होण्याची शक्यता व्यक्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वीचे सचिव हणमंतराव सूर्यवंशी व लेखापाल एस. एस. साळवी यांना समितीचे पैसे बँकेतून काढण्याचे अधिकार होते. त्याच्या काळात ९ लाख ९६ हजार रुपये या दोघांनी काढले आहेत. परंतु त्यातील १ लाख ३९ हजार रुपये बँकेत भरलेले नसल्याचे समजते. ही रक्कम कुणी भरायची यावरून दोघांत तू..तू..मैं..मैं.. सुरू असल्याचे समजते. त्यामुळे या रक्कमेचा अपहार झाल्याची चर्चा आहे. देवस्थान समितीचा निधी या अधिकार्‍यांनी जास्त दराने व्याज मिळेल अशा ठेवीमध्ये गुंतवण्याऐवजी ती रक्कम बचत खात्यावर ठेवण्यात येत होती. त्यामुळे समितीचे व्याजाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. यासंबंधी समितीच्या सदस्या पद्मा तिवले यांच्याशी संपर्क साधला असता तसे काही घडले नसल्याचे सांगितले. व्यवस्थापक धनाजी जाधव यांनी मंदिरात कॅशचा सगळा व्यवहार बँकेमार्फत होतो. साडी, लाडू विक्रीतून आलेली कॅश त्याचदिवशी जमा होते. त्यामुळे एवढी रक्कम शिल्लक असण्याचे अथवा त्याचा अपहार होण्याची शक्यता नाही, असे सांगितले. समितीचे सहाय्यक सचिव व लेखापाल असलेले साळवी यांनाही त्यासंबंधी विचारले असता त्यांनी असे काही घडले नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)