शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शहीद माने यांच्या कुटुंबीयांची परवड

By admin | Updated: August 5, 2015 00:09 IST

आश्वासने विरली हवेत : स्मारकाचा प्रश्न अंधातरीच, कुटुंबाचे रेशनही बंद

अनिल पाटील - मुरगूड -देशाचे संरक्षण करताना सीमेवर दहा आॅगस्ट २0१३ ला पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पिंपळगाव बुद्रुक (ता. कागल) येथील कुंडलिक केरबा माने यांच्या कुटुंबीयांची परवड सुरूच आहे. अगदी रेशन, एस.टी.पास, आदी शासकीय सेवा या कुटुंबीयांच्या बंद झाल्या असून, त्यांच्या घरी गवतातून, चिखलातून जावे लागते. मानेंच्या अंत्यसंस्कारावेळी नेत्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली असून शासनाच्या उदासीन धोरणामुळे कुंडलिक माने यांच्या स्मारकाचा प्रश्नही अंधातरीच राहिला आहे. कुंडलिक माने शहीद झाल्याची बातमी सर्वच वर्तमानपत्रांमधून व वृत्तवाहिन्यांवरून सलग तीन चार दिवस दिल्याने अंत्यसंस्काराला तर लाखोंची गर्दी झाली होती. त्याच दिवशी तत्कालीन मंत्रिमंडळातील बड्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवत मानेंच्या स्मृती जपण्यासाठी मोठमोठी आश्वासने दिली होती. त्यातील बहुतेक आश्वासने हवेत विरली आहेत.तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांचे एका महिन्याचे वेतन माने कुटुंबीयांना देण्याचे अभिवचन दिले होते; पण आमदार हसन मुश्रीफ, राजू शेट्टी, सदाशिवराव मंडलिक, राजेश क्षीरसागर, सा. रे. पाटील व रामदास आठवले यांच्याशिवाय कोणत्याही राजकीय व्यक्तीचे मानधन कुटुंबीयांना मिळाले नाही. मिळालेल्या रकमेतून माने कुटुंबीय स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम साजरे करीत आहेत. कुंडलिक यांच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असून, कुटुंबाच्या पालन पोषणासाठी वीरपत्नी राजश्री किंवा वीरबंधू विजय यापैकी एकास शासनाने नोकरीत घेण्याचे अभिवचन दिले होते. त्याची अंमलबजावणी झालीच नाही. धक्कादायक बाब म्हणजे, कुंडलिक माने शहीद झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरामध्ये त्यांच्या कु टुंबीयांना देण्यात येणारे रेशनसुद्धा शासनाच्या प्रतिनिधींनी बंद केले आहे. त्यामुळे शासकीय सेवा का बंद झाल्या, हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे. शहीद मानेंच्या गावाच्या बाहेर असणाऱ्या घरी जाण्यासाठी पक्का रस्ता सुद्धा शासनाला करता आला नाही. शहिद मानेंच्या अंत्ययात्रेवेळी युद्धपातळीवर संपूर्ण गावचे रस्ते चकाचक करणारे प्रशासक आता गप्प का ? टीव्ही, वर्तमानपत्रांतून प्रसिद्धी मिळविण्यासाठी घटनेवेळी पुढे-पुढे असणारे नेते, कार्यकर्ते या माने कुटुंबाच्या सर्व प्रश्नांकडे लक्ष देतील का? असा प्रश्न यानिमित्ताने माने यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या पूर्व संध्येला निर्माण होत आहे.सैनिकी शाळा नाहीचशासनाने परिसरामधील मानेंच्या स्मृतिप्रीत्यर्थ सैनिकी प्रशिक्षण शाळा स्थापण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी राज्यात सत्तेत काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार होते. पिंपळगावमध्ये भव्य स्मारक बांधण्याचा मनोदय अनेक स्थानिक नेत्यांनी बोलून दाखविला; पण दोन वर्षे उलटली, तरी अद्याप या स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली नाही.