शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात विंचवाच्या नवीन प्रदेशनिष्ठ प्रजातीचा शोध

By संदीप आडनाईक | Updated: February 7, 2025 14:22 IST

कोल्हापूरसह सात जणांचे संशोधन : कृतज्ञता म्हणून डॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव

संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली परिसरातून विंचवाच्या नवीन प्रजातीचा शोध लावण्यात राज्यातील संशोधकांना यश मिळालेले आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण व्यवस्थेत दिलेल्या अमूल्य योगदानाप्रति कृतज्ञता म्हणून ‘आयसोमेट्रस ज्ञानदेवाय’ असे नाव या प्रजातीस देण्यात आले आहे.या संशोधन मोहिमेत सांगोला येथील महेश बंडगर आणि क्रांती बंडगर, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. ओमकार यादव आणि सौरभ कीनिंगे, दहिवडी कॉलेजचे डॉ. अमृत भोसले, डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे देवेंद्र भोसले आणि कोल्हापुरातील आशुतोष सूर्यवंशी यांचा सहभाग आहे. हा शोधनिबंध दि. ३० ऑक्टोबर रोजी ‘जर्नल ऑफ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून प्रकाशित झाला आहे.नव्याने शोधलेल्या प्रजातीचा समावेश ‘आयसोमेट्रस’ या कुळात केला आहे. या कुळातील विंचू मुख्यत्वे झाडांच्या खोडांवर वावरतात. पट्टणकोडोली परिसरातील नारळाच्या झाडांवर ही प्रजाती प्रथमतः महेश बंडगर, आशुतोष सूर्यवंशी आणि देवेंद्र भोसले यांना आढळली. पुढे डॉ. ओमकार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रजातीच्या रचनाशास्त्राचा आणि जनुकीय संचाचा सखोल अभ्यास केला. त्यातून ही प्रजाती कुळातील इतर प्रजातींहून वेगळी असल्याचे सिद्ध झाले. आकार, पृष्ठभागावरील आणि शेपटीवरील वैशिष्ट्यपूर्ण दाणेदार रचना, पेक्टिनल टीथची संख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण जनुकीय संचावरून ही प्रजाती कुळातील इतर प्रजातींपासून वेगळी ठरते.

‘आयसोमेट्रस कुळातील विंचू त्यांच्या झाडांच्या खोडांवरील वावरासाठी ओळखले जातात. ‘आयसोमेट्रस ज्ञानदेवाय’ ही प्रजाती शेताच्या बांधावरील झाडांवर आढळली. या विंचवांचा रंग झाडांच्या खोडांशी मिळताजुळता आहे, त्यामुळे हे विंचू सहजासहजी दिसून येत नाहीत. ते निशाचर आहेत. दिवसा झाडांच्या सालींखाली विश्रांती घेतात. - डॉ. ओमकार यादव, संशोधक.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरResearchसंशोधन