शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमा

By admin | Updated: November 28, 2015 00:31 IST

मेघराज राजेभोसले : मराठी चित्रपट-नाट्य व्यावसायिक कृती समितीची मागणी

कोल्हापूर : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची कार्यकारिणीची मुदत येत्या १० डिसेंबरला संपत आहे. मुदत संपत आली असतानाही तीन वर्षांच्या खर्चाचा हिशोब या कार्यकारिणीने दिलेला नाही. त्यामुळे अनेक भ्रष्टाचाराचे आरोप असलेली ही कार्यकारिणी त्याचपूर्वी बरखास्त करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट-नाट्य व्यावसायिक कृती समितीच्यावतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत समिती अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केली. गेल्या वर्षभरापासून आम्ही कृती समितीच्या माध्यमातून महामंडळाची सध्याची भ्रष्टाचारी कार्यकारिणी बरखास्त करावी, अशी मागणी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. कलामहर्षी बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, चित्रपती व्ही. शांताराम, बाबूराव पेंढारकर अशा अनेक महान कलाकारांनी चित्रपटसृष्टीची बिजे येथे रोवली, वाढविली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना केली. त्यासाठी सुधीर फडके, राम कदम, कमलाकर तोरणे, प्रभातकुमार, बाळासाहेब सरपोतदार, आदी चित्रकर्मिंनी महामंडळाचे कार्य समृद्ध करण्यासाठी परिश्रम घेतले, असे हे महामंडळ मुंबईला हलविण्याचा घाट ही मंडळी करीत आहेत, अशा सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या महामंडळामध्ये गेल्या पाच वर्षांत प्रचंड गैरव्यवहार, अनागोंदी, मनमानी कारभार सुरू आहे. याशिवाय लाखो रुपयांची उधळपट्टी झाली आहे. ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात झालेला आर्थिक घोटाळा ध्यानात येताच सर्वच काळ््या घटनांना वाचा फुटली. शासन दरबारी, आयकर, विक्रीकर, आदी कार्यालयात याबाबत अनेक तक्रारी केल्या गेल्या. तरी अद्यापही न्याय मिळालेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर महामंडळाचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी आम्ही सुरू केलेल्या सनदशीर आंदोलनाचा लढा म्हणून येत्या मंगळवारी (दि. १ डिसेंबर) महामंडळाच्या देवल क्लब येथील कार्यालयासमोर दारातच एक दिवसाचे आत्मक्लेष - लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. प्रथम कोल्हापूर व काही दिवसांनी पुणे, मुंबई येथील महामंडळाच्या कार्यालयासमोर असे आत्मक्लेष उपोषण केले जाणार आहे. या मार्गाने जर प्रश्न सुटला नाही, तर नव्या वर्षात १ जानेवारीला महामंडळासमोर आमरण उपोषण करू, असे राजेभोसले यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस कार्यवाह भालचंद्र कुलकर्णी, अर्जुन नलावडे, सुरेंद्र पन्हाळकर, छाया सांगावकर, हेमसुवर्णा मिरजकर, बबिता काकडे, आदी रंगकर्मी उपस्थित होते.