शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

थेट पाइपलाइन पूर्ण; आता ‘आयटी पार्क’साठी पाठपुरावा करणार - आमदार सतेज पाटील 

By भीमगोंड देसाई | Updated: November 11, 2023 17:49 IST

नऊ वर्षांतील माझे प्रयत्न जनतेला माहीत आहेत, टीकाकारांना उत्तर देणार नाही

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेसाठी नऊ वर्षांत मी किती बैठका घेतल्या, पालकमंत्री असताना किती प्रयत्न केले, हे सर्वांना माहीत आहे. यामुळे माझ्यावर केलेल्या टीकेला उत्तर देणार नाही. जनतेची भावना, करवीर निवासिनी अंबाबाईच्या आशीर्वादामुळे ही योजना पूर्ण झाली आहे. आता शहरातील आयटी पार्कसाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन आमदार सतेज पाटील यांनी शनिवार पत्रकार परिषदेत दिले.आमदार पाटील म्हणाले, थेट पाइपलाइन योजना विविध परवानगी, तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण होण्यास विलंब लागला. यामुळे अनेकांची केलेली टीका सहन करून सकारात्मक पाठपुरावा करून एक शाश्वत योजना पूर्णत्वास नेल्याचा आनंद आहे. योजनेच्या पाण्याचे वितरण शहरात सर्वत्र होण्यासाठी ११ पाण्याच्या टाक्यांचे कामही गतीने होईल. पाणी सुरू झाल्यानंतर काही ठिकाणची गळती समोर आली. ती काढून योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल.पत्रकार परिषदेस आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.ऊस दराच्या आंदोलनातून मार्ग निघेलस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची ऊस दराची मागणी रास्त आहे. या मागणीसाठी ते ऐन दिवाळीत आंदोलन करणे जिल्ह्याच्या दृष्टीने भूषणावह नाही. मी, हसन मुश्रीफ, विनय कोरे दराच्या मागणीवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील