भानामतीविरोधात दिनकरांचे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:23 AM2021-01-18T04:23:12+5:302021-01-18T04:23:12+5:30

भानामतीविरोधात दिनकरांचे प्रबोधन भानामतीविरोधात दिनकरांचे प्रबोधन सरदार चौगुले, लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ...

Dinkar's awakening against Bhanamati | भानामतीविरोधात दिनकरांचे प्रबोधन

भानामतीविरोधात दिनकरांचे प्रबोधन

googlenewsNext

भानामतीविरोधात दिनकरांचे प्रबोधन

भानामतीविरोधात दिनकरांचे प्रबोधन

सरदार चौगुले,

लोकमत न्यूज नेटवर्क

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथील ग्रामपंचायतीची निवडणूक करणी आणि भानामतीच्या जंतरमंतरने चर्चेने चांगलीच गाजली.उमेदवाराच्या दारापासून ते वेशीपर्यंत भानामतीचे नाना प्रकार अनुभवायला मिळाले.

गावात भानामतीसाठी वापरलेले सर्व उतारे गोळा करून बुलेट गाडीला बांधून अंनिसचे कार्यकर्ते दिनकर चौगुले यांनी गावातून अंधश्रद्धेविरोधात प्रबोधन फेरी काढून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

निवडणुकीत जादूटोणा, करणीचे प्रकार वाढत आहेत. करणी म्हणजे करणाऱ्याचे मनोधैर्य वाढविणे आणि समोरच्याचे खच्चीकरण करण्यासाठी केलेले नाटक होय. विरोधकाच्या नावाने भानामती अंधाराचा फायदा घेत गुपचूप केली असली तरी, दुसऱ्यादिवशी उजेडात येतेच. भानामतीच्या प्रकाराने गावात काही दिवस सावळागोंधळ निर्माण केल्याने अंधश्रद्धेचीचं चर्चा होते.

गावात ठिकठिकाणी टाकलेले उतारे गोळा करून दिनकररावांनी अंधश्रध्देच्या कर्मठ विचारांच्याविरोधात प्रबोधन करण्याचे धाडस केले. नारळ, मिर्च्या, बिबे, बाहुल्या, काळा दोरा गोळा करून बुलेट गाडीला बांधून अंधश्रद्धेविरोधात प्रबोधन फेरी काढली. अंधश्रध्देविरोधात काढलेली जनजागृती फेरी पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली.

करणीच्या उताऱ्याने निकाल बदलत नाही, तर मानसिकता बदलण्यासाठी केलेली उठाठेव आहे. विकास काम आणि माणुसकीच्या भावनेतून राजकारण केले, तर निवडणुकीत जंतरमंतर किंवा चमत्काराची गरज नाही, असे पन्हाळा तालुका अंनिसचे उपाध्यक्ष दिनकर चौगुले यांनी सांगितले.

चौकट

अंधश्रध्दा बाळगणाऱ्यांना चपराक

निवडणूक असो किंवा अन्य कारण, करणी केलेला उतारा लोक ओलांडायचे तर सोडाच, त्याकडे पाहतही नाहीत. कारण काय, तर तो उतारा आपल्यावर उलटला तर काय करायचं; परंतु अंनिसचे कार्यकर्ते दिनकर चौगुले यांनी दिवसाढवळ्या हे उतारे गावातून फिरवून, उतारे देणाऱ्यांना आणि ठेवणाऱ्यांना चांगलीच चपराक दिली आहे.

Web Title: Dinkar's awakening against Bhanamati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.