शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

दिनानाथसिंह यांची संघर्षगाथा कुस्तीगीरांसाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 19:48 IST

Wrestling Lokmat Kolhapur- वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवलेला एक मुलगा.. गंगा नदीचे पावित्र्य लाभलेली वाराणसी ही जन्मभूमी सोडून महाराष्ट्रात येतो, तबेल्यात राहून कष्टाने कुस्तीचा सराव करतो आणि हिंदकेसरीचा सर्वोच्च मानाचा किताब पटकावतो आणि पंचगंगेला कर्मभूमी माननू कोल्हापुरच्या कुस्ती परंपरेच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवतो.. अशा या पैलवान दिनानाथसिंह यांची संघर्षगाथा कुस्तीगीरांसाठी प्रेरणादायी आहे अशा भावना शनिवारी मान्यवरांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देदिनानाथसिंह यांची संघर्षगाथा कुस्तीगीरांसाठी प्रेरणादायी मान्यवरांच्या भावना : लाल माती आत्मचरित्राचे प्रकाशन

कोल्हापूर : वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवलेला एक मुलगा.. गंगा नदीचे पावित्र्य लाभलेली वाराणसी ही जन्मभूमी सोडून महाराष्ट्रात येतो, तबेल्यात राहून कष्टाने कुस्तीचा सराव करतो आणि हिंदकेसरीचा सर्वोच्च मानाचा किताब पटकावतो आणि पंचगंगेला कर्मभूमी माननू कोल्हापुरच्या कुस्ती परंपरेच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवतो.. अशा या पैलवान दिनानाथसिंह यांची संघर्षगाथा कुस्तीगीरांसाठी प्रेरणादायी आहे अशा भावना शनिवारी मान्यवरांनी व्यक्त केल्या. निमित्त होतं दिनानासिंह यांचा आयुष्यपट उलगडणाऱ्या व लोकमतचे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या लाल माती या आत्मरचित्राच्या प्रकाशनाचे.राजर्षी शाहू स्मारक भवनात मान्यवरांच्या मांदियाळीत व कुस्तीगीरांच्या साक्षीने झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, लोकमतचे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, राष्ट्रीय कुस्ती तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील उपस्थित होते. यावेळीदीड लाखांची मदतदीड वर्षापूर्वी दिनानाथ सिहं यांच्या उपचारासाठी लोकमतने केोल्या आवाहनानंतर भरघोस निधी मिळाला होता. या कार्यक्रमातही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फौंडेशनच्यावतीने एक लाखांचा निधी जाहीर केला. तर प्रयाग चिखली येथील एस. आर. पाटील व पांडूरंग पाटील यांनी ५० हजारांचा धनादेश दिनानाथसिंह यांना सुपूर्द केला.हिंदकेसरीच्या मैदानात लोकमतची घोषणायावेळी दिनानाथसिंह यांनी लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांची आठवण सांगितली. जवाहरलालजी व जांबुवंतराव धोटे हे वारंवार कुस्ती पाहायला यायचे. हिंदकेसरीची अंतिम स्पर्धा पाहायला ते आले होेते. त्यावेळी दोघांनी मिळून मला १हजार दहा रुपये बक्षीस दिले होते. या मैदानात जवाहरलालजी दर्डा यांनी मी लोकमतची स्थापना करत असल्याचे जाहीर केले होते.

टॅग्स :Wrestlingकुस्तीkolhapurकोल्हापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटliteratureसाहित्य