शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ही दोस्ती तुटायची नाय! ज्या चौकात धार्मिक दंगल; तिथे हिंदू-मुस्लीम ऐक्य, वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 18:08 IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये दंगलीच्या घटना घडत आहेत.

कोल्हापूर - छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत सर्वधर्म समभाव या विचारांवर चालणाऱ्या लोकांची कमी नाही. त्यातीलच दोन मित्र, दिलीप चौगुले आणि गनी तांबोळी, या दोघांचा धर्म वेगळा परंतु मैत्री धर्माहून अधिक मजबूत आहे. मागील २३ वर्षापासून कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पान शॉप चालवतात. कधीही त्यांचा धर्म व्यवसायाच्या आड आला नाही. कोल्हापूरात जिथं धार्मिक हिंसा घडली, दगडफेक झाली त्याच भागात हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले दोघे मित्र पानाचे दुकान चालवतात. 

दिलीप चौगुले आणि गनी तांबोळी हे ३५ वर्षापासून मित्र आहेत. प्रत्येक सुखदुखात एकमेकांसोबत ताकदीने उभे राहतात. सुरुवातीला गनी तांबोळी पान विकत होता तर दिलीप चौगुले याचे पानाचे दुकान होते. या व्यवसायातून दोघेही एकमेकांना चांगले ओळखू लागले. हळूहळू या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. दोघांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मामू पानाचे दुकान सुरू करत व्यवसायात भागीदारी केली. मागील २३ वर्षापासून ते या व्यवसायात आहेत. दोघेही प्रामाणिकपणे काम करतात. कायम एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जातात. 

दोन्ही कुटुंबांमध्ये जात-धर्म कधीच येत नाहीते दोघे एकमेकांची चेष्टा करतात आणि आनंद वाटून घेतात. दोघांचे कुटुंबही त्यांच्याशी जोडले गेले आहे. जवळच्या नात्यापेक्षाही मोलाचे नाते त्यांनी बांधले आहे. चौगुले आणि तांबोळी कुटुंबातील सदस्य एकाच कुटुंबातील असल्यासारखे राहतात. दोन कुटुंबांमध्ये जात-धर्म कधीच येत नाही. 'रमजान' असो की 'दिवाळी', दोन्ही कुटुंबे एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होऊन सण साजरे करतात. एकाच्या कपाळावर कुंकू आणि दुसऱ्याच्या डोक्यावर गोलाकार पांढरी टोपी हा त्यांचा रोजचा पेहराव.

दंगल झालेल्या भागात छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अवघ्या काही अंतरावर चौगुले आणि तांबोळी काका गेल्या २३ वर्षांपासून जात-धर्म बाजूला ठेवून पान दुकान चालवत आहेत. दुकानात पान खायला येणारा प्रत्येक ग्राहक त्यांच्या समन्वयाचे कौतुक करतो. कोल्हापुरात पर्यटनासाठी येणारे अनेक पर्यटक कुतुहलाने चौगुले, तांबोळी चाचा यांचे फोटो काढतात.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये दंगलीच्या घटना घडत आहेत. ज्या कोल्हापुरात अनेक दशके पुरोगामी विचारांचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात त्या कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम दंगलीमुळे या विचाराला तडा गेला आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पण दुसरीकडे चौगुले, तांबोळी यांच्यासारख्या कट्टर मित्रांची मैत्री पाहता पुरोगामी विचारसरणीला अजून तडा गेलेला नाही, असे नक्कीच म्हणता येईल. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर