शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जयप्रभा स्टुडिओच्या जागेवर बांधकामास मुभा, लता मंगेशकर यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 06:17 IST

जयप्रभा स्टुडिओची जागा विकासकाला देण्याविरोधात अखिल भारतीय चित्रपट महामंडळासह नऊ चित्रपट व्यावसायिकांनी कोल्हापूर महानगरपालिका आणि लता मंगेशकर यांच्याविरोधात दाखल केलेल्या दाव्यावर बुधवारी अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने हा निकाल दिला.

कोल्हापूर : येथील जयप्रभा स्टुडिओच्या मिळकतींवर कोणतेही बांधकाम करण्यास गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुभा असल्याचे सांगत या विरोधात अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि चित्रपट व्यावसायिकांनी दाखल केलेला दावा वरिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायाधीश ए. ए. भोसले यांनी खर्चासह फेटाळला. जयप्रभा स्टुडिओची जागा विकासकाला देण्याविरोधात अखिल भारतीय चित्रपट महामंडळासह नऊ चित्रपट व्यावसायिकांनी कोल्हापूर महानगरपालिका आणि लता मंगेशकर यांच्याविरोधात दाखल केलेल्या दाव्यावर बुधवारी अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने हा निकाल दिला.

भालजी पेंढारकर यांनी उभारलेला हा स्टुडिओ लता मंगेशकर यांनी खरेदी केला होता. त्यांनी २०१४ मध्ये खासगी विकासकास ही जागा दिल्याने त्यांच्या विरोधात कोल्हापूरकरांनी मोठे आंदोलन उभारले. त्यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने जयप्रभा स्टुडिओ राज्य शासन आणि कोल्हापूर महापालिकेने संपादन करून चित्रपटसृष्टीसाठी जतन करावे, यासाठी कोल्हापूरच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता.

पेंढारकर यांच्या पत्नीच्या नावे जयप्रभा स्टुडिओ करताना १९४७ मध्ये झालेल्या खरेदीपत्रात त्यावेळच्या संस्थानने ही मिळकत चित्रपट व्यवसायासाठीच वापरावी, अशी घातलेली अट १९८२मध्ये महाराष्ट्र शासनाने रद्द केलेली आहे; त्यामुळे कोणत्याही कारणासाठी या मिळकतीचा वापर करण्याचा अधिकार लता मंगेशकर यांना आहे. ही मिळकत २0१२ मध्ये वारसास्थळाच्या वर्ग तीनच्या यादीत असली, तरी आयुक्तव वारसास्थळ समितीच्या परवानगीनेच तेथे पाडापाडी, दुरुस्ती, विकास व वाणिज्य वापरास मुभा आहे. मिळकत सार्वजनिक कारणासाठी संपादन करण्याचा धोरणात्मक निर्णय शासन व महापालिकेने घेणे अपेक्षित आहे. दिवाणी न्यायालय निर्देश देऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.

ही तर वैयक्तिक मिळकतजयप्रभा स्टुडिओ ही लता मंगेशकर यांनी १९५९ मध्ये कोर्ट लिलावामध्ये खरेदी केलेली वैयक्तिक मिळकत आहे. या जागेवर महापालिकेने २००६ साली बागबगीचा व सांस्कृतिक केंद्राचे आरक्षण टाकले होते; मात्र दोन वर्षांनी म्हणजेच २००८ मध्ये दुसऱ्या विकास आराखड्यात या जागेवर कोणतेही सार्वजनिक आरक्षण टाकले नाही; त्यामुळे जागेवर अन्य कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा शासनाला आपला हक्क सांगता येणार नाही, तसेच या मिळकतीत लता मंगेशकर यांनी कोणतीही पाडापाडी केलेली नाही किंवा विक्री करण्याचा निर्णय घेतलेला नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी केला.

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरkolhapurकोल्हापूर